केएफसी, पिझ्झा हट चालवणाऱ्या कंपनीने नोंदवली मोठी कमाई; शेअर्समध्ये तुफान तेजी, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Devyani International Stock :केएफसी, पिझ्झा हट आणि कोस्टा कॉफी सारख्या ब्रँडचे आउटलेट चालवणाऱ्या क्विक-सर्व्हिस रेस्टॉरंट (QSR) ऑपरेटर देवयानी इंटरनॅशनलने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे, कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवार, २१ एप्रिल रोजी एनएसईवर ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि किंमत १७६.४२ रुपयांवर पोहोचली. शेअर ४.२३% वाढीसह १७२ रुपयांवर बंद झाला. ७ एप्रिल २०२५ रोजी या शेअरची किंमत १३०.०५ रुपये होती. या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. तसेच, सप्टेंबर २०२४ मध्ये, हा शेअर २२२.७५ रुपयांवर पोहोचला होता. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. स्काय गेट हॉस्पिटॅलिटीमध्ये गुंतवणूकदेवयानी इंटरनॅशनलने संकेत दिले की ते स्काय गेट हॉस्पिटॅलिटीमध्ये नियंत्रणात्मक भागभांडवल मिळविण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. कंपनी बिर्याणी बाय किलो (BBK) ब्रँड तसेच इतर ब्रँड अंतर्गत रेस्टॉरंट्स चालवते. कंपनी प्राधान्य तत्वावर इक्विटी शेअर्स जारी करून संपादनासाठी निधी उभारेल. शेअर्सची बाजारातील कामगिरीएम्के ग्लोबलने देवयानी इंटरनॅशनलच्या शेअर्सवर खरेदीची शिफारस केली असून लक्ष्य किंमत २०० रुपये केली आहे. पूर्वी लक्ष्य किंमत १७० रुपये होती. स्काय गेट हॉस्पिटॅलिटीचे ४० हून अधिक शहरांमध्ये १०६ रेस्टॉरंट्स आहेत, असे कोटक इक्विटीजच्या तज्ज्ञांनी सांगितले. यापैकी ६५-७० क्लाउड किचन आहेत. कंपनीला आर्थिक वर्ष २०२५ मध्ये सुमारे ३०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. १९९१ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत कंपनी भारत, थायलंड, नायजेरिया आणि नेपाळमधील २८० हून अधिक शहरांमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्समध्ये २,०३० हून अधिक स्टोअर्स चालवते. ही कंपनी आरजे कॉर्पची आहे. देवयानी शेअरहोल्डिंग शेअरहोल्डिंग पॅटर्नदेवयानीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाले तर, प्रवर्तकांकडे ६२.७२ टक्के भागिदारी आहे. तसेच, सार्वजनिक भागभांडवल ३७.२८ टक्के आहे. कंपनीच्या प्रवर्तक आरजे कॉर्प लिमिटेडकडे ७१,४८,२१,९७० शेअर्स किंवा ५९.२६ टक्के भागिदारी आहे. प्रवर्तक वरुण जयपुरिया यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांची कंपनीत ३.२८ टक्के भागिदारी आहे.