5900
दाजीपूर : शामाप्रसाद मुखर्जी योजनेतून येथील शाळांना वस्तू देताना वनाधिकारी
.......
जनवन योजनेंतर्गत शाळांना प्रोजेक्टर, टीव्ही भेट
राधानगरी : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेंतर्गत ग्राम परिस्थितीकी विकास समितीच्या वतीने दाजीपूर येथील जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर व श्री. आ. कृ. बोंबाडे माध्यमिक विद्यालय ओलवण-दाजीपूर शाळेस प्रत्येकी एक प्रोजेक्टर स्क्रीन व एलईडी टीव्ही असा सुमारे दोन लाख ३७ हजार रुपये किमतीच्या वस्तू भेट देण्यात आल्या. यावेळी दाजीपूर वन विकास समितीचे अध्यक्ष सिद्धेश मोरजकर, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, परिस्थितीकी विकास समिती ओलवणचे अध्यक्ष सुभाष पाटील सरपंच प्रतिभा कोरगावकर, उपसरपंच शंकर चव्हाण, रेश्मा मोरजकर, शारदा कोरगावकर, ओमप्रकाश कोरगावकर, प्रिया पाटील, तनुजा पडवळ, प्रार्थना पाटील, विजया कोरगावकर तसेच वनपाल धनाजी पाटील, वनरक्षक मोहन देसाई उपस्थित होते. दाजीपूर शाळेचे मुख्याध्यापक दत्तप्रसाद मोरजकर यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक वाय. एम. सुतार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दोन्ही शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. आर. एस. पाटील यांनी आभार मानले.