वाढत्या उष्णतेमुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. यासाठी अनेकजण त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय करत असतात. जेणे करून त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होणार नाही. यासाठी बहुतेकजण नारळाचे तेल त्वचेसाठी फायदेशीर असल्याने त्याचा वापर करतात. कारण कोरड्या त्वचेवर नारळाचे तेल लावल्याने त्वचा मॉइश्चरायझ होते. तसेच हे तेल अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्मांनी समृद्ध आहे. म्हणूनच ते स्किन केअर करण्यासाठी बऱ्याच काळापासून वापरले जात आहे. परंतु प्रत्येक गोष्टीच्या फायद्यांसोबत काही नुकसान देखील होण्याची शक्यता असते. हाच नियम नारळाच्या तेलालाही लागू होतो. जर तुम्ही त्वचेवर नारळाचे तेल लावत असाल तर हे तेल अशा पद्धतीने न लावल्यास त्वचेच्या समस्या आणखी उद्भवू शकतात.
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय सिंघल सांगतात की कधीकधी नारळाचे तेल त्वचेला फायदा होण्याऐवजी नुकसान करू शकते. जर तुमची त्वचा तेलकट, संवेदनशील किंवा मुरुमांनी ग्रस्त असेल तर नारळाचे तेल त्वचेला हानी पोहोचवू शकते. चेहऱ्यावर नारळाचे तेल लावल्याने त्वचेच्या कोणत्या समस्या वाढू शकतात ते आपण आजच्या लेखात जाणून घेऊया.
नारळाचे तेल कॉमेडोजेनिक आहे, म्हणजेच ते त्वचेचे छिद्र बंद करू शकता. जेव्हा छिद्रे बंद होतात तेव्हा त्यामध्ये घाण आणि तेल जमा होऊ लागते. यामुळे मुरुमे, ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सची समस्या वाढते. तेलकट किंवा मुरुमांची समस्या असलेल्या लोकांनी विशेषतः नारळ तेलाचा वापर योग्य पद्धतीने करावा.
नारळाच्या तेलाचा मॉइश्चरायझिंग प्रभाव खूप मजबूत असतो. जर तुमची त्वचा आधीच तेलकट असेल आणि तुम्ही नारळाचे तेल लावल्यास तुमची त्वचा अधिक तेलकट होऊ शकते. धूळ आणि घाण देखील त्यावर लवकर चिकटते, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.
तेलकट त्वचेप्रमाणे, संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी देखील चेहऱ्यावर नारळाचे तेल लावताना खूप काळजी घेतली पाहिजे. यामुळे त्वचेवर पुरळ, सूज आणि ॲलर्जीक प्रतिक्रिया वाढू शकतात.
त्वचेवर नारळाचे तेल लावण्यापूर्वी नेहमी आपले हात साबणाने आणि कोमट पाण्याने चांगले धुवा. खराब हातांनी चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने त्वचेचे संक्रमण वाढू शकते. जर तुम्ही उन्हाळ्यात नारळाचे तेल लावत असाल तर 2-3 थेंब घ्या आणि हलक्या हातांनी त्वचेवर पसरवा. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर नारळाचे तेल लावणे अधिक फायदेशीर आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)