'10 मे'ला भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली, परंतु त्याआधी भारताने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश घडवून आणला आणि हे भारताच्या मेड इन इंडिया सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसने केले.
भारत आणि रशियाने मिळून बनवलेली, जगातील एक शक्तिशाली आणि वेगवान सुपरसोनिक मिसाइल.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केले आहे, या क्षेपणास्त्राचे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियातील मोस्कवा नदीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
स्पीड: 3 मॅक (आवाजाच्या वेगाच्या 3 पट)
रेज: 290 ते 450 किमी पर्यंत
हिट: लँड, सी आणि एअर टार्गेट्स
या क्षेपणास्त्राच्या विकासासाठी 250 दशलक्ष डॉलर्स खर्च झाले, जे आजच्या काळात 2,135 कोटी रुपयांच्या समतुल्य आहे. या प्रकल्पात भारताने 50.5% योगदान दिले आहे, तर रशियाने 49.5% योगदान दिले आहे.
ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या अधिकृत किंमतीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नसली तरी, मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्राह्मोसच्या उत्पादन युनिटची किंमत अंदाजे 300 कोटी रुपये आहे आणि एका क्षेपणास्त्राची किंमत अंदाजे 34 कोटी रुपये आहे.
भारत आता ब्रह्मोस मिसाइल फिलिपाइन्सला निर्यात करत आहे.
डिफेन्स एक्स्पोर्टमध्ये भारताची ही मोठी झेप!
ब्रह्मोस म्हणजे भारताची डिफेन्स क्षेत्रातील सशक्त ओळख.
प्रिसीजन, पॉवर आणि प्रेस्टिज यांचा संगम आहे.