BrahMos ही एक सुपरसोनिक क्रूझ मिसाइल आहे जी 3 मॅकच्या वेगाने लक्ष्यावर अचूक हल्ला करते. आकाशातून ही मिसाइस दुष्मनावरही डागता येते.
भारतातील सर्वात घातक सुपरसॉनिक मिसाईल – ब्रह्मोस! पाकिस्तानलाही झोप उडवणाऱ्या या क्षेपणास्त्रामागे कोण आहे?
ही आहे डॉ. ए. शिवथाणु पिल्लई यांची कहाणी – ज्यांनी भारत-रशिया भागीदारीतून ब्रह्मोस विकसित करण्याचा ध्यास घेतला.
ब्रह्मोस ही सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल आहे, जी जल, थल आणि नभातून मारा करू शकते. या मिसाईलची गती म्हणजे आवाजाच्या वेगाच्या 3 पट!
डॉ. पिल्लई हे APJ अब्दुल कलाम यांचे निकटवर्ती सहकारी होते. DRDO आणि ISRO मध्ये त्यांचा अमूल्य वाटा होता.
ब्रह्मोस एरोस्पेस कंपनीचे ते संस्थापक MD होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अचूकतेचा नवा मानदंड गाठला.
आजही त्यांचे कार्य भारताच्या संरक्षण क्षमतेचा मजबूत आधार आहे.
त्यांना "father of Brahmos" म्हणून गौरवले जाते.