Mumbai News : मध्य रेल्वेवर विशेष पॉवर ब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल, कधी कुठे आणि कसा?
Saam TV May 14, 2025 02:45 AM

मध्य रेल्वेवर दिनांक १४/१५.०५.२०२५ (बुधवार/गुरुवार) आणि दिनांक १५/१६.०५.२०२५ (गुरुवार/शुक्रवार) रात्री कांजुर मार्ग पाइपलाइन गर्डर उतरवण्यासाठी कांजुर मार्ग-भांडुप विभागात विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. 25/138-140 किमीवरील कांजुर मार्ग पाईपलाईन पुलाचे गर्डर350T रोड क्रेनद्वारे उतरवण्यासाठी कांजुर मार्ग आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर; अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि पाचव्या मार्गावर विशेष वाहतूक पॉवर ब्लॉक परिचालीत करणार आहे.

ब्लॉकचे तपशील खालीलप्रमाणे:

ब्लॉक १- दिनांक: १४/१५.०५.२०२५ (बुधवार / गुरुवार रात्री)

ब्लॉक कालावधी: ०१:१५ वाजता ते ०३:१५ वाजेपर्यंत (०२.०० तास)

ट्रॅफिक ब्लॉक विभाग: अप आणि डाऊन धीम्या मार्गावर; अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि पाचवी मार्गिका कांजुर मार्ग मुलुंड दरम्यान

ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन धीम्या मार्गिका; अप आणि डाऊन जलद मार्गिका आणि पाचव्या मार्गिकेवरील स्थानकांदरम्यान सेवा रद्द केल्या जातील.

उपनगरीय गाड्या रद्द:

१. टी १ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२४ वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०१.१९ वाजता पोहचणारी सेवा रद्द राहणार.

२. टी २ ठाणे येथून ०४.०४ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०५.०० वाजता पोहचणारी सेवा रद्द राहणार.

ब्लॉक २ - दिनांक: १५/१६.०५.२०२५ (गुरुवार/शुक्रवार रात्री)

ब्लॉक कालावधी: ०१:१५ वाजता ते ०३:१५ वाजेपर्यंत (०२.०० तास)

ट्रॅफिक ब्लॉक विभाग:- स्लो लाईन्स; अप आणि डाउन फास्ट लाईन्स आणि ५व्या आणि ६व्या लाईन्स

ब्लॉक काळात कांजूर मार्ग आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन स्लो मार्गावरील सेवा; अप आणि डाउन फास्ट मार्गावरील सेवा आणि पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील सेवा रद्द केल्या जातील.

उपनगरीय गाड्या रद्द:

१. टी १ येथून ००.२४ वाजता सुटेल आणि ठाणे ०१.१९ वाजता पोहचणारी सेवा रद्द राहणार.

२. टी २ ठाणे येथून ०४.०४ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येथे आगमन ०५.०० वाजता पोहचणारी सेवा रद्द राहणार.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.