मुगलेआझममधील अनारकलीची कथा केवळ काल्पनिक नाही, तिचा खरा इतिहास लाहोरच्या किल्ल्यात आजही जिवंत आहे.
अकबराने अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्याकडे मागितलेल्या नवसानंतर सलीमचा जन्म झाला.
अनारकलीचे खरे नाव नादिरा बेगम किंवा शरफुन्निसा होते. ती इराणमधून एका व्यापारी ताफ्यासह लाहोरला आली होती.
नादिरा एक उत्कृष्ट नृत्यांगना होती. तिचे नृत्य अकबराला खूप आवडले आणि त्यानेच तिला 'अनारकली' हे नाव दिले.
शहजादा सलीम आणि अनारकली यांच्यात हळू हळू प्रेमसंबंध निर्माण झाले. अकबराला हे पसंद नव्हते.
त्यांच्यावर अंकुश न ठेवता आल्याने संतप्त अकबराने अनारकलीला लाहोर किल्ल्याच्या भिंतीत जिवंत पुरण्याचा क्रूर आदेश दिला.
जेव्हा सलीम सम्राट जहांगीर बनला, तेव्हा त्याने अनारकलीच्या अवशेषांना बाहेर काढून लाहोरमध्ये तिची सुंदर समाधी बांधली.
ब्रिटिश प्रवासी विल्यम फिंच आणि टेरी यांनीही अनारकलीच्या मृत्यूची नोंद आपल्या लेखनात केली आहे.
शिखांचे राज्य असताना ही कबर एका जनरलचे निवासस्थान बनली. त्यानंतर इंग्रजांनी तिचे चर्चमध्ये रूपांतर केले.
आजही लाहोरमधील पंजाब सिव्हिल सचिवालयाच्या आवारात अनारकलीचा मकबरा (कब्र) अभिलेखागार (Records office) म्हणून वापरला जातो.
भरत जाधव यांना सगळ्यात जास्त आवडते कोल्हापुरमधील 'ही' गोष्ट