Maharashtra Today Live Updates: दहावीच्या परीक्षेत नांदेड जिल्ह्याचा 91% निकाल
Saam TV May 14, 2025 06:45 AM
दहावीच्या परीक्षेत नांदेड जिल्ह्याचा 91% निकाल

शालांत परीक्षेचा निकाल दुपारी ऑनलाईन पद्धतीने घोषित झाला असून यात नांदेड जिल्ह्याचा 91 टक्के निकाल लागला आहे.या निकालात मुलींना 94 पूर्णांक 21 टक्के तर मुलांना 88 पूर्णांक 15 टक्के यश या निकालात मिळाले आहे. त्यामुळे यावर्षीही दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. दहावीच्या निकालात लातूर विभागात नांदेड जिल्ह्याचा तिसरा क्रमांक राहिला आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना क्लास न लावता हे यश मिळवता येते अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पुणे शहर भाजपच्या शहराध्यक्ष पदावर पुन्हा धीरज घाटे

कोण आहेत धीरजघाटे पाहूया..

पुण्याच्या सामाजिक क्षेत्रात गेल्या 32 वर्षांपासून धीरजगाटे सक्रिय आहेत. पुणे महापालिकेच्या नगरसेवक पदावर असताना धीरज घाटे यांनी महापालिकेचे सभागृह नेतेपद सुद्धा भूषवला आहे. साने गुरुजी मंडळ व हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून धीरज घाटे यांनी राजकीय तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. शहरातील अनेकांसोबत दांडगा संपर्क असलेली धीरज घाटे हे स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारामधून आलेले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणे शहराच्या भाजपाचे संघटन मजबूत करण्यासाठी घाटे यांचा वाटा मोठा आहे.

मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा येथे भीषण अपघात

मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा येथे भीषण अपघात, ओरोस वरून कुडाळ कडे जाणाऱ्या डंपर ने दोघांना उडविले

या अपघातात अनुष्का माळवे राहणार अणाव व विनायक निळेकर राहणार रानबांबुळी हे दोघेही ठार झाले आहेत

अनुष्का व विनायक हे दोघेही मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांच्यासमोर इनोव्हा कारचा अपघात झाला. हा अपघात मोटरसायकल थांबून दोघेही पाहत होते. एवढ्यात मागून येणाऱ्या डंपरने दोघांनाही धडक दिली या धडकेत अनुष्का व विनायक जागीच मृत्युमुखी पडले.

ओरोस कडून कुडाळ च्या दिशेने जात असलेल्या इनोव्हा कार ने लाईट च्या खांबाला धडक दिली या कार मधील ऐकून दहा प्रवाशी जखमी झाले त्यांना जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल करण्यात आले आहे

अनुष्का व विनायक या वर्षीच दोघेही 12 वी परीक्षा उत्तीर्ण झाले होते

घटनास्थळी सिंधुदुर्ग नगरी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास पोलीस करत आहेत

मुरबाडच्या बागेश्वरी तलावाचं होणार सुशोभीकरण

राज्य शासनाच्या सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत मुरबाड नगरपंचायत हद्दीतील बागेश्वरी तलावाचं सुशोभीकरण आणि संवर्धन केलं जाणार आहे. या कामाचं भूमीपूजन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. मुरबाड शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या बागेश्वरी तलावाचं सुशोभीकरण आणि संवर्धन करण्यासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेतून 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत बागेश्वर तलावाचं खोलीकरण केलं जाणार आहे. याशिवाय तलावाचा विस्तार करून जलसाठाही वाढवला जाणार आहे. त्यामुळे मुरबाडकरांची भविष्यातील पाण्याची चिंता मिटणार आहे.

पुणे - भाजपकडून आज राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यात बदल

भाजपकडून आज राज्यभरातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यात बदल करण्यात आला आहे

यात पुणे शहराच्या शहर अध्यक्षपदावर मात्र धीरज घाटे यांना कायम ठेवण्यात आलं आहे

काही दिवसांपूर्वी प्रदेश स्तरावरील मुख्य नेते आणि पदाधिकारी यांच्या मार्फत बंद लिफाफ्यातून शहराध्यक्ष पदासाठी नाव मागविण्यात आली होती

या नावांमध्ये धीरज घाटे यांचं नाव अग्रगण्य असल्याचे बोलले जात होते

लोकसभा निवडणूक असो किंवा विधानसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकीच्या दरम्यान धीरज घाटे यांनी शहराध्यक्ष पद भूषवलं आहे

दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर शहराध्यक्ष पद हे धीरज घाटे यांनाच कायम राहील अशी चर्चा होती

त्यामुळे भाजपच्या प्रदेश स्तरावर पुन्हा एकदा धीरज घाटे यांनाच शहराची जबाबदारी देण्यात आली आहे

दहावी बोर्डात 100 पैकी 100 गुण घेणारे 113 विद्यार्थी लातूर विभागाचे

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी ssc बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.. यात लातूर विभागातून 113 विद्यार्थ्यांनी शंभर पैकी 100 गुण मिळवले आहेत... तर विभागाचा निकाल हा 92.77% इतका लागलाय.. तर यंदा दहावी एसएससी बोर्डच्या परीक्षेकरिता लातूर भागातून 1 लाख 7 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.. त्यापैकी 97 हजार790 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत...

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात

- गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस

- -

- वादळी वाऱ्यासह पावसाला पुन्हा एकदा सुरुवात-

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेती पिकांचे झाले मोठ्या प्रमाणात नुकसान.

गेल्या सातव्या दिवशी नाशिकमध्ये पावसाची हजेरी

Solapur News: शेतकऱ्यांचे सिंचन भवन बाहेर ठिय्या आंदोलन

सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आ. सुभाष देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांचे सिंचन भवन बाहेर ठिय्या आंदोलन

- सीना नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी आ. सुभाष देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांचे सिंचन भवन बाहेर ठिय्या आंदोलन

- सीना नदी कोरडी पडल्याने दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्यातील अनेक शेतीपिके धोक्यात

- संबंधित अधिकाऱ्यांनी सोमवारी पाणी सोडण्याचा दिलेला शब्द न पाळल्याने शेतकरी आक्रमक

- गेल्या अनेक वर्षांपासून सीना नदी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही कोरडी पडत असल्याने पशुधन धोक्यात

- जोपर्यंत पाणी सोडणार नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा शेतकऱ्यांचा इशारा

Sharad Koli: ठाकरे गटाचे नेते शरद कोळीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

शरद कोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकरी शब्दात उल्लेख करत महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप आहे. शरद कोळी यांच्या गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा ही येथील शिवप्रेमींनी दिला आहे. यामुळे ठाकरे गटाचे नेते शरद कोळी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय परंपरेला शोभेल अशा पद्धतीची वस्त्र धारण करूनच यावीत, असे पत्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जाहीर केले आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात यापूर्वीच ड्रेस कोड संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याची कडक अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. गेली अनेक महिने भाविक दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर आणि कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात अनेक भाविक पाश्चात्य संस्कृतीचे ड्रेस तसेच तोकडे कपडे घालून येत असल्याचे निदर्शनास येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने भाविकांसाठी नियमावली जाहीर केलेली आहे. तसेच मंदिरात येत असताना पुरुषांनी पूर्ण कपडे तसेच महिलांनी साडी किंवा चुडीदार अशा पद्धतीच्या वस्त्रांचा वापर करावा असे म्हटले आहे.

Maharashtra 10th Class Result Live Updates: अवकाळी पावसानंतर नदी नाले ओसंडून वाहू लागले

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या पिंपळनेर पश्चिम पट्ट्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाचा जोर सुरू आहे, आणि त्यामुळे नदी नाले देखील तुडुंब भरून वाहू लागले आहेत, आईन उन्हाळ्यामध्ये नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे,

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतांमध्ये देखील पाणी साचले आहे, परंतु या पावसाचा फायदा शेतकऱ्यांना पेरणीसाठी होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मानला जात आहे.

सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक

छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आंबेडकर पक्ष संघटनांचे आंदोलन

उपमुख्यमंत्री अजित पवार,मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात आंदोलन

सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवणाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

Pune News: उत्तर पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात

उत्तर पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली असुन रस्त्यांवर पाणीच पाणी झालेय तर काही भागात गारांचाही पाऊस सुरुय

मागच्या दोन दिवसांपासून वातावरणात उकाडा जाणवत असताना सकाळपासुन वातावरणात गारवा तयार झाला होता त्यामुळे उकाड्यापासुन दिलासा मिळत असताना पाऊसाची जोरदार बँटिंग सुरु झाली असुन टोमँटो आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहे

Kolhapur News: अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड

अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात पारंपारिक पद्धतीने कपडे परिधान करून प्रवेश करा

धार्मिक विधीच्या अनुषंगाने तोकडे कपडे न घालता पारंपारिक पद्धतीने भक्तांनी कपडे परिधान करावेत

मंदिरातील धार्मिकतेचा आदर करून सर्वांनी पारंपारिक पद्धतीने कपडे परिधान करा

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच भाविकांना आवाहन

करवीर निवासिनी अंबाबाई देवस्थान हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्त्वाचे पीठ असून या मंदिराचे महत्व फार आहे

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने प्रसिद्धीपत्रक जारी करत केलं भक्तांना आवाहन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना कॉल...

नांदेडच्या देगलूर येथील भूमिपुत्र सचिन वनंजे जम्मू येथे कर्तव्यावर असतांना शहीद झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी त्यांच्या पत्नी माधुरी वनंजे त्याच्याशी फोनवरून संवाद साधत धीर दिला आहे. राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी हा संवाद करून दिला आहे. आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आपल्या कुटुंबियाची काळजी घेणं आमच्या कर्तव्य आहे. असं म्हणत माधुरी वनंजे याचं सांत्वन केल आहे.

Pune News: ६ जून पर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज

पुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी आज पूर्व मॉन्सून पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या ६ जून रोजी मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

२७ मे रोजी केरळ मध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात मॉन्सून ६ जून आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुण्यात सर्वत्र पावसाची हजेरी: हवामानात गारवा, नागरिकांमध्ये उत्साह

गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असताना आज पुणेकरांना पावसाने दिलासा दिला आहे. शहराच्या सर्वच भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते आणि दुपारनंतर अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली.

शिवाजीनगर, डेक्कन, कोथरूड, हडपसर, कात्रज, बाणेर, औंध, हिंगणे, पिंपरी-चिंचवड आणि वाघोली या परिसरांत मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. काही भागांत विजांसह सरी कोसळल्या, ज्यामुळे थोड्या वेळासाठी वीजपुरवठा आणि वाहतूक यंत्रणा काहीशी विस्कळीत झाली.

Nashik News: नाशिक सिटी लिंक बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने बसची तीन गाड्यांना धडक..

सिटी लिंक बस चालकास फिट आल्याने त्याचे नियंत्रण सुटले रस्त्याच्या बाजूला उभे असलेल्या एक दुचाकी सह दोन चारचाकी वाहनांना धडक...

अपघात नंतर नागरिकांची गर्दी वाहतूक कोंडी

अपघातात तिन्ही वाहनांचा नुकसान कोणी ही जखमी नाही....

उल्हास नदीकिनारी चोरट्यांचा सुळसुळाट

बदलापुरातल्या उल्हास नदीकिनाऱ्यावर चोरट्यांचा अक्षरशः सुळसुळाट झालाय. या चोरट्यांनी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची चारचाकी गाडी फोडत एक लाखाचा ऐवज लंपास केलाय. या चोरट्यांनी एकाच दिवशी दोन पर्यटकांची गाडी फोडल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालय.

तापमानात प्रचंड वाढ; पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका

वातावरणातील तापमान ४० शी पार केल्याने उष्माघाताचा धोका वाढत असुन कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढलेय त्यातच अंड्यांचे दरही घसरलेत. या दुहेरी संकटामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. पक्षांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी आणि वातावरण थंड ठेवण्यासाठी पाण्याचे फवारे मारून थंडावा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दहावीचा निकाल आज जाहीर; महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद

दहावी बोर्डचा आज निकाल

पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद

दहावी बोर्ड निकालाच्या अनुषंगाने पुण्यात मंडळाची पत्रकार परिषद

पुण्यात पुन्हा "कोयता वॉर"

गाडी जोरात का चालवली या कारणावरून तिघांकडून कोयत्याने मारहाण

पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना

केवळ गाडी फास्ट नेण्यावरून फिर्यादी आणि आरोपींमध्ये वाद

आरोपींकडून थेट कोयत्याने मारहाण

बिबवेवाडी पोलिसांकडून तीन आरोपींना अटक

ऋतिक बाबू पवार, ओमकार गव्हाणे, सूरज शिंदे अस अटक आरोपीचे नाव

कोयत्याने मारहाण करतानाच CCTV व्हायरल

पेन्शन नातेवाईकांना दिली म्हणून आईला कुकरने मारले, सोलापुरातील घटना

पेन्शन नातेवाईकांना दिल्याने आईला कुकरणे मारल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली

विजयालक्ष्मी चिंचणपुरे असे जखमी झालेल्या आईचे नाव

या प्रकरणी जेलरोड पोलिसांनी मुलगा हर्षल चींचणपुरे या संशयित आरोपीला पोलिसांनी केली अटक

अटक करून पोलिसांनी हर्षल चींचणपुरे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिली 2 दिवसांची पोलीस कोठडी

सोलापुरातील अन्नपूर्णा संकुल अपार्टमेंट येथे घडली घटना

संशयित आरोपी हर्षल चींचणपुरे हा शिक्षण विभागात लिपिक म्हणून कामाला आहे

थोड्याच वेळात लागणार दहावीचा निकाल

११ वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये धाकधूक वाढली आहे.

मुंबई पुर्व उपनगरात पुन्हा पावसाच्या रिमझिम सरी कोसळण्यास सुरुवात

मुंबई पुर्व उपनगरात पुन्हा पावसाच्या रिमझिम सरी कोसळण्यास सुरुवात

भांडुप, विक्रोळी, पवई ,घाटकोपर परिसरात रिमझिम पाऊस सुरू

याच दिवशी गेल्या वर्षी घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला होता

सामंत आणि राज ठाकरे यांच्यात तासभर चर्चा

शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जातेय.

बुलढाण्याला अवकाळीचा तडाखा

बुलढाणा जिल्हयात मागील काही दिवसांपासून भाग बदलत अवकाळी पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, जळगाव जामोद, मेहकर, बुलढाणा , सिंदखेड राजा सह परिसरातील तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला .. तर दोन दिवसांपासून सुद्धा वादळी. वाऱ्यासह अवकाळी पडतोय .. आज सकाळपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू असून ढगाळ वातवरण आहे .. त्यामुळे वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाला आहे ..

अवकाळीचा नाशिक जिल्ह्याला मोठा तडाखा

- अवकाळीने जिल्ह्यातील ३,८६७ हेक्टरवरील पिकांचं नुकसान

- ६५९ गावातील १५,३३३ शेतकऱ्यांच्या पिकांना अवकाळीचा फटका

- अवकाळीचा सर्वाधिक फटका कांद्याला, आंबा, डाळिंब, टोमॅटो, गहू, मक्यासह भाजीपाला पिकं मातीमोल

- नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू, दररोज होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता

- १४ मे पर्यंत नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा इशारा

मराठवाड्यात अवकाळी पावसाचा कहर,मराठवाड्यात वीज पडून 6 जणांचा मृत्यू तर 14 जनावरे दगावली.

मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीचा फटका मराठवाड्यातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांसह फळबागांना बसला आहे.यात जालना जिल्ह्यातील 1 हजार 923 बाधित क्षेत्र आहे. गेल्या महिन्यातही अवकाळी पावसामुळे 3 हजार 36 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते .नुकसानीचा अंतिम अहवाल अद्याप शासनाकडे गेलेला नाही. दरम्यान मराठवाड्यात वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 14 जनावरे देखील दगावली आहेत. मे महिन्यांतील पैकी 7 दिवस

अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी पावसामुळे मक्यासह अन्य उन्हाळी पिकांना फटका बसला. तसेच फळबागादेखील बाधित झाल्या आहेत. प्राथमिक अहवालानुसार, विभागातील १७ हेक्टर जिरायत क्षेत्र, १ हजार ४८० हेक्टरवरील बागायत आणि १ हजार १८ हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला आहे.

पुण्यात चार दिवस येलो अलर्ट

पुणे शहरात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणेकरांना उन्हाळ्याच्या झाळापासून काहीसा दिलासा मिळाला आहे

तर पुढील चार दिवसात कमाल तापमानामध्ये किंचित घट होणार असून

मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

त्यामुळे पुणे शहराला पुढील चार दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय....

मनसे अध्यक्ष राज ठाकरे २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

- १५ आणि १६ मे ला राज ठाकरे नाशकात

- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज यांचा नाशिक दौरा महत्वाचा

- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज काय कानमंत्र देणार, पाहणं महत्वाचं

- राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा

- उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे देखील नाशिक दौऱ्यावर

- राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात शिवसेना ठाकरे गट, मनसेच्या युतीसंदर्भात आढावा घेतला जाण्याची शक्यता

विदर्भ क्रिकेट असोसिएशनला 4 कोटी 56 लाख रुपयांच्या वसुलीच्या नोटीसला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

- व्हीसीएसबाबत नागपूर तहसीलदार यांनी बजावलेली नोटीस अवैध असल्याचा दावा

- विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या विविध क्रिकेट मॅचच्या पोलीस बंदोबस्ताच्या शुल्क वसुलीसाठी बजावली होती नोटीस

- शहर तहसीलदारांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशनला ही नोटीस बजावली होती, नोटीसला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली अंतरिम स्थगिती

- २५ जूनपर्यंत तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि महसूल सजीवांना उत्तर सादर करण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यानास भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॅचलर रोड वर्धा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यानास भेट दिली व त्यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन कार्यावर आधारित शिल्प प्रदर्शनीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. या स्मरणिकेमध्ये राज्यातील प्रसिद्ध लेखकांचे लेख, सामाजिक संस्थेद्वारे राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमांचे छायाचित्र आदींचा समावेश आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळी कलाटणी दिली. सावरकरांनी स्वातंत्र्यवीर म्हणून तर काम केलेच सोबतच अनेक क्रांतीकारक तयार केले. दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा एकत्रित झालेला स्वातंत्र्य इतिहासातला एकमेक नायक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, अशा थोर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वर्धा येथे उभारलेल्या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीलाही प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कडक उन्हामुळे पुणे विभागातील चारही जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्यावर परिणाम

पुणे विभागात २१३ टँकरच्या माध्यमातून १ हजार २४९ वाड्या, २०८ गावे, ३ लाख ७० हजार नागरिक आणि २ लाख ६५ हजार जनावरांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

पुणे विभागातील सर्वाधिक ८३ टँकर पुणे जिल्ह्यात सुरू असून, आंबेगाव तालुक्यात तालुक्यात ४१ हजार ४४० नागरिकांना २१ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

तर, तालुकानिहाय संख्या लक्षात घेता सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात ५१ टँकरच्या साहाय्याने ७१ हजार ७५० नागरिक आणि ४९ हजार जनावरांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाचा तडाखा

- रात्री त्र्यंबकेश्वरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस

- अवकाळीमुळे शहरातील रस्ते पाण्याखाली, सखल भागात साचलं पाणी

- वीजपुरवठा देखील खंडित झाल्यानं भाविकांसह नागरिकांना मनस्ताप

- पुढील काही दिवस नाशिकला पावसाचा अलर्ट कायम

एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी

बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे आज सकाळी पुण्यात पञकार परिषद घेऊन हा निकाल जाहिर करतील.

यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी या शालांत परिक्षेला बसले होते

दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट वर पालकांना आणि मुलांना हा निकाल पाहता येईल

मान्सून आज अंदमान-निकोबार बेटावर धडक मारण्याची शक्यता

दक्षिण बंगालच्या उपसागरातले नैरूत्य मोसमी वारे हा पहिला पाऊस घेऊन येतील. हवामान खात्यानेच हा अंदाज वर्तवलाय..यंदा मान्सूनचं आगमन आठवडाभर आधीच होतंय

कांद्याचे दर घसरले,कांदा उत्पादक शेतकरी आर्थीक संकटात

धाराशिव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थीक संकटात सापडलाय.उन्हाळी कांदा काढणीला आल्यावर अवकाळीचा तडाखा बसला यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा भिजल्याने नुकसान झाल आणि त्यातच जो कांदा निघाला तो विक्री करण्याची वेळ आल्यावर कांद्याचे दर घसरले आहेत.दोन महीन्यापुर्वी 40 रुपये किलो असलेला कांद्याचा दर 10 रुपये प्रति किलोवर आला आहे.त्यामुळे लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.ऐकीकडे गृहीणींना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आल आहे.त्यामुळे कांद्याला किमान २५ ते ३० रुपये दर मिळावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांतुन केली जात आहे

यवतमाळ जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाला सुरूवात

यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून ढगाळी वातावरण असताना. रविवारी मध्यरात्री दरम्यान पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली.आज सकाळपासून वादळ वाऱ्यासह विजेंचा कडकडाटतात पुन्हा अवकाळी पावसाने जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुरुवात झाली केली असून या पावसामुळे खरीप हंगामाच्या कामाला वेग येणार आहे. शेवटच्या टप्प्यात काढण्यासाठी आलेला भुईमूग या पिकाला काही प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उन्हाचा ‘ताप’ कमी! ढगाळ, पावसाळी हवामान १७ मेपर्यंत कायम राहण्याची चिन्हे

गेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ, पावसाळी हवामान येत्या १७ मेपर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहेत. ढगाळ, पावसाळी हवामानामुळे कमाल आणि किमान तापमानात घट झाली असून, यंदाच्या मे महिन्याचा पूर्वार्ध तापमानाच्या दृष्टीने सुसह्य ठरला आहे.

Pune : पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर आता कारवाई

दंड आणि नळजोडही तोडण्याचा पुणे महापालिकेचा विचार

शहरात ज्या भागात पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुणे, बागकाम तसेच रस्ते धुण्यासाठी केला जातो, तेथील नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तरीही सुधारणा न झाल्यास प्रसंगी त्यांचा नळजोड तोडण्यात येणार आहे.

शहरातील सर्व भागांतील नागरिकांना समान आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना सुरू केली आहे. योजनेचे काम अनेक भागांमध्ये ९० टक्के पूर्ण झाले असून, तेथे महापालिकेने मीटर बसविले आहेत. त्यामुळे कोणत्या भागात किती पाणी जाते, याची माहिती महापालिकेला मिळत आहे.

पुणे शहरात आता एसी स्वच्छतागृहे

पुणे महापालिकेचा प्रस्ताव; प्रसाधनगृह, वायफायसह इतर आधुनिक सुविधा

कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने वातानुकुलित (एसी) स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

शहराच्या प्रवेशद्वारांजवळ, तसेच पुणे स्टेशन परिसरात ही स्वच्छतागृहे उभारण्यात येणार असून, याचा उपयोग प्रामुख्याने महिलांना होणार आहे.

या स्वच्छतागृहांसाठी महापालिकेने प्रस्ताव मागविले आहेत. या स्वच्छतागृहांमध्ये वायफाय, मोबाइल आणि लॅपटॉप चार्जिंग सुविधा असणार आहे. नागरिकांना ठरवीक शुल्क भरून स्वच्छतागृहाचा वापर करता येणार आहे. शहरात दररोज हजारो नागरिक नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडतात. शहरात महापालिकेच्या वतीने अनेक भागांत नागरिकांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्याची स्वच्छता योग्य पद्धतीने केली जात नसल्याने त्याचा फारसा वापर केला जात नाही.

ऑल द बेस्ट... आज दहावीचा निकाल

आज दहावीचा निकाल, विद्यार्थी आणि पालकांमध्ये धाकधूक वाढली

- नागपूर विभागात 679 केंद्रावरून 1 लाख 51 हजार 379 विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा

- सर्वाधिक विद्यार्थी 58 हजार 495 विद्यार्थी नागपूर जिल्हयातील

- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल..

पंढरपुरात पावसाच्या सरी

पंढरपुरात रात्री अवकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची एकच तारांबळ उडाली. पंधरा ते वीस मिनीटे झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले.

पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे . मागील दिवसांपासून उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

अध्यात्म शक्तीमुळे आपण पाकिस्तानसह अनेकांना धडा शिकवू शकतो - शिंदे

अध्यात्मामुळे आपण पाकिस्तानसह अनेकांना धडा शिकवू शकतो असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुलढाण्यात केलं. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील इसरोळ येथे गीता परिवारातर्फे पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी आपल्या देशात अध्यात्म शक्ती आहे अध्यात्मामुळे अनेक समस्यांचं सोल्युशन निघत असेही ते म्हणाले.

दुचाकी आणि चार चाकी वाहनाची समोरासमोर धडक,दुचाकीस्वार तरुण ठार

सांगलीच्या मिरजेमध्ये चार चाकी दुचाकीचा भीषण अपघात झालेला मध्ये दुचाकी स्वार करून ठार झालाय जमीर मुजावर व 27 असे या तरुणाचं नाव आहे.

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर मिरज कोल्हापूर दरम्यान अपघात झाला आहे. दुचाकीस्वार तरुण हा विरुद्ध दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव चार चाकी वाहनाला जोरदार जाऊन धडकला, यामध्ये समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वर तरुण जमीर मुजावर हा रस्त्याच्या कडेला जाऊन पडला,ज्यामध्ये तो जागीच ठार झाला.घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली होती.

रविकांत तुपकर घराच्या अंगणातच कुटुंबासह करणार उपोषण

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा आज १३ मे रोजी जन्मदिवस असून तूपकरांचा वाढदिवस दरवर्षी अतिशय साध्या पद्धतीने साजरा होतो.. तुपकर यांना भेटण्यासाठी अनेक शेतकरी चाहते येत असतात शुभेचा देत असतात .. मात्र यावेळी रविकांत तुपकर आंदोलनात्मक पद्धत्तीने जन्मदिवस समर्पित करणार आहेत.. तुपकर चाहत्यांना भेटतील पण, कोणतेही बॅनर लावू नका, पुष्पगुच्छ आणू नका, असे आवाहन तुपकर यांनी केले आहे.. आज जन्मदिवसाच्या रोजी सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ९ वाजे पर्यंत रविकांत तुपकर त्यांच्या घराच्या अंगणात सहकुटुंब अन्नत्याग करणार आहेत.. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह इतर मागण्यांवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करण्यात येणार आहे.. तर पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला, त्यानंतर झालेल्या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रम गाजवत पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले.. मात्र यात देखील काही जवानांसह सीमेवरील गावातील काही नागरिकांचा मृत्यू झाला.. शहीद भारतीय जवानांसह नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी देखील तुपकर व त्यांचे कुटुंबीय एक दिवशीय उपवास करणार आहेत..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.