SSC Exam Result : शिरूर तालुक्यातील ३७ शाळांना शंभर नंबरी यश; गतवर्षीच्या तुलनेत निकालाचा टक्का मात्र घसरला
esakal May 14, 2025 07:45 AM

शिरूर - दहावीच्या परीक्षेत शिरूर तालुक्यात मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. गतवर्षीच्या तूलनेत निकालाचा टक्का घसरला असला तरी शंभर नंबरी यश मिळविणाऱ्या शाळांची संख्या वाढली आहे.

दहावीचा निकाल आज जाहीर झाला. यात शिरूर तालुक्याचा सरासरी निकाल ९७.२९ लागला असून, गतवर्षीच्या तूलनेत दीड टक्क्याने निकाल घसरला आहे. गतवर्षी ३४ शाळांचा निकाल शंभर टक्के होता. यावेळी ३७ शाळांनी शंभर टक्के यश मिळविले आहे.

तालुक्यातील ८२ शाळांमधील सहा हजार ७२४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सहा हजार ५४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी दिली.

शिरूरमधील ज्ञानगंगा विश्वविद्यालय, रसिकलाल माणिकचंद धारिवाल इंग्लिश मिडिअम स्कूल, विजयमाला विद्यामंदिर, बालाजी माध्यमिक विद्यालय, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मिडिअम स्कूल व जिजामाता इंग्लिश मिडिअम स्कूल यांच्यासह न्हावरे येथील श्री मल्लिकार्जून विद्यालय, मुखईच्या श्री संभाजीराव पलांडे प्रगती हायस्कूल, सविंदणेचे श्री गुरूदेव दत्त विद्यालय, इनामगावचे न्यू इंग्लिश स्कूल, निमोणे येथील श्री नागेश्वर विद्यालय, धामारीचे न्यू इंग्लिश स्कूल, विठ्ठलवाडीचे श्री पांडुरंग विद्यामंदिर, वडनेर खुर्दचे श्री गुरूनाथ विद्यालय, अण्णापूरचे न्यू इंग्लिश स्कूल, वाघाळे येथील कालिकामाता विद्यालय, सरदवाडीचे अभिनव विद्यालय, निर्वीचे तात्यासाहेब के. सोनवणे विद्यालय, तांदळीचे कै. के. पी. गदादे विद्यालय, उरळगावचे न्यू इंग्लिश स्कूल, वढू बुद्रूक चे शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय, जातेगाव बुद्रूक चे छत्रपती संभाजीराजे विद्यालय, चिंचोली मोराची येथील जय मल्हार माध्यमिक विद्यालय, आलेगाव पागाचे श्री भैरवनाथ विद्यालय, चिंचणी येथील शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालय, करंजावणे येथील एकता विद्यालय, बाभुळसर बुद्रूक येथील पद्मश्री अप्पासाहेब पवार माध्यमिक विद्यालय, कोरेगाव भीमा येथील फ्रेंडशिप एज्युकेशन इन्स्टिट्युट, मुखई ची स्व. आर. जी. पलांडे माध्यमिक आश्रमशाळा, पाबळ चे श्री पद्ममणी इंग्लिश मिडिअम स्कूल, कोंढापूरी येथील आरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, शिक्रापूरचे अजिंक्यतारा इंग्लिश मिडिअम स्कूल, रांजणगाव गणपती येथील महागणपती इंग्लिश मिडिअम स्कूल व अक्षरनंदन गुरूकूल स्कूल, कारेगाव येथील अक्षरनंदन गुरूकुल स्कूल व कारेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूल व तळेगाव ढमढेरे येथील ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.

इतर शाळा व त्यांच्या निकालाची टक्केवारी कंसात पुढीलप्रमाणे -

विद्याधाम प्रशाला, शिरूर (९९.७८), श्री भैरवनाथ विद्यामंदिर ॲण्ड ज्युनिअर कॉलेज, पाबळ (९५.९७), स्वातंत्र्यसैनिक आर. बी. गुजर प्रशाला, तळेगाव ढमढेरे (९४.९७), मंगलमूर्ती विद्याधाम, रांजणगाव गणपती (९७.९२), विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर (९५.१२), छत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वडगाव रासाई (९३.९६), न्यू इंग्लिश स्कूल, मलठण (९३.६६), छत्रपती संभाजी महाराज हायस्कूल, कोरेगाव भीमा (९१.३०), सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल, केंदूर (९१.११) वाघेश्वर विद्याधाम, मांडवगण फराटा (९०.५२), न्यू इंग्लिश स्कूल, शिरूर (९७.६९), विद्याधाम हायस्कूल, कान्हूर मेसाई (९७.८४), न्यू इंग्लिश स्कूल, कवठे येमाई (९७.८२), श्री भैरवनाथ विद्यालय, करडे (९७.२६), विद्याविकास मंदिर, निमगाव म्हाळुंगी (९८.८३), मा. बापूसाहेब गावडे विद्यालय, टाकळी हाजी (९५.९०), श्री दत्त विद्यालय, पिंपरखेड (९८.८०), महर्षि शिंदे हायस्कूल, आंबळे (९७.९१), विद्यानिकेतन प्रशाला, कोंढापूरी (९०.२४), जय मल्हार हायस्कूल, जांबूत (९७.७६), स्वातंत्र्यसेनानी स्व. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय, हिवरे (९९.३३), विद्याविकास मंदिर, करंदी (९९.०३), श्री सद्गुरू कृपा विद्यालय, नागरगाव (९७.२२), माध्यमिक विद्यालय, सणसवाडी (९८.३७), श्रीमती बबईबाई टाकळकर आश्रमशाळा, निमगाव म्हाळुंगी (९७.२९), न्यू इंग्लिश स्कूल, पिंपळसुटी (९६), मा. बापूसाहेब गावडे विद्यालय, म्हसे बुद्रूक (९४.४४), हनुमान माध्यमिक विद्यालय, निमगाव भोगी (९५), आयेशा बेगम उर्दू हायस्कूल, शिरूर (९०), श्री संतराज महाराज विद्यालय, रांजणगाव सांडस (९६.२२), श्री दामोदार ताठे माध्यमिक विद्यालय, कारेगाव (९५.१६), न्यू इंग्लिश स्कूल, भांबर्डे (८९.३६), महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय, पिंपळे जगताप (८९.४७), आदर्श विद्यालय, वरूडे (९६.५५), बापूसाहेब गावडे विद्यालय, चांडोह (९५.६५), समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तळेगाव ढमढ़ेरे (९९.२५), सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड हायस्कूल, कासारी (९७.२२), श्री घनोबा माध्यमिक विद्यालय, धानोरे (९३.३३), स्व. आबासाहेब पाचंगे विद्यालय, ढोकसांगवी (९८.३३), श्री दत्त माध्यमिक विद्यालय, गुनाट (७६.६६), श्री काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय, कोयाळी (९८.२१), रसिकलाल धारिवाल माध्यमिक विद्यालय, गणेगाव (८६.९७), मा. पांडुरंगअण्णा थोरात विद्यालय, आमदाबाद (८०), शिवाजी विद्यालय, गोलेगाव (९२.३०), जीवन विकास मंदिर, शिरूर (९६.९६).

शिरूर तालुक्यातील दहावीच्या परीक्षेचा एकूण निकाल : ९७.२९

नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी : ६७४४

परीक्षा दिलेले एकूण विद्यार्थ : ६७२४

उत्तीर्ण झालेले एकूण विद्यार्थी : ६५४२

विशेष योग्यता : २४१४

प्रथम श्रेणी : २३८१

द्वितीय श्रेणी : १३३८

तृतीय श्रेणी : ४०९

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.