खेड तालुक्यातील जामगे येथील श्री क्षेत्र कोटेश्वरी मनाई मंदिर येथे देवीचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवात देवीच्या पालखीची शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक पार पडली. राज्यमंत्री योगेश कदम यांनीही भक्तिभावाने पालखी नाचवत देवीचं दर्शन घेतलं. या धार्मिक आयोजनाने परिसरात भक्ती, संस्कृती आणि एकतेचं दर्शन घडवलं.
धाराशिवच्या कळंब शहरात मध्यरात्री दीड वाजता घरफोडी, चोरट्यांनी ८५ वर्षीय व्यक्तीवर केला प्राणघातक हल्लाचोरट्यांनी फायटरने वार करुन केले जखमी, जखमी व्यक्तीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात केले दाखल
चोरट्यांचा हल्ल्यात ८५ वर्षीय वृध्द सदाशिव पारखे यांचा एक डोळा निकामी तर दोन्ही हातांवर,कपाळावर व कानावर खोल जखमा
कळंब शहरातील पुनर्वसन सावरगाव भागातील प्रदीप पारखे यांच्या घरी चोरट्यांचा हैदोस
कळंब तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे पोलिसांसमोर आव्हान
माळशिरस सह सहा तालुक्यात 32 टॅंकरने पाणी पुरवठामाढा, माळशिरस, करमाळा, सांगोलासह सहा तालुक्यातील 26 गावांना 32 टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. माळशिरस तालुक्यातील सर्वाधिक आठ ते दहा गावांना टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे तर सांगोला तालुक्यातील काही गावे आणि वाड्यावस्त्यांना पाणी पुरवले जात आहे.
Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात अवकाळीच थैमाननंदुरबार जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातला आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
नंदुरबार तालुक्यातील आष्टा येथील शेतकरी सुकलाल आधार खंदारे यांनी त्यांच्या तीन एकर शेतात जानेवारी कांद्याची लागवड केली होती.
लागवड, मजुरी, फवारणी या मशागतीतून त्यांना दीड लाखाचा खर्च आला. त्यांनी कांदा काढण्यासाठी सुरुवात केल्यानंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली.
सहा दिवसापासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षीही कापसाचे नुकसान झाले होते.
मात्र पिक विमा काढून ही त्यांना त्याची भरपाई मिळाली नाही. कांद्याचा पिक विमा काढत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे....
Dharashiv: धाराशिव येथील एसटी बसस्थानकात मॉकड्रीलधाराशिव येथील बसस्थानकावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते.बस डेपोमध्ये अचानक पेट घेतल्याची आपत्कालीन परिस्थिती उभी करून त्या अनुषंगाने विविध यंत्रणांची तयारी तपासण्यात आली.याला सर्वच यंञणांनी जलद प्रतिसाद दिला या मॉकड्रिल प्रसंगी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शोभा जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नवीन मूग बाजारात दाखल, ७५११ रुपयांपर्यंत मिळाले दरवाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी हंगामातील नवीन मुगाची आवक व्हायला सुरुवात झाली आहे, मुगाला ६ हजार ८७० ते ७ हजार ५११ रुपयांपर्यंत दर मिळालेत. बाजार समितीमध्ये दिड हजार क्विंटल मुगाची आवक झाल्याचं बघायला मिळालं. जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी मूग काढणीची घाई करत असून चांगले दर मिळत असल्यानं लगेच विक्रीसाठी आणत आहे. जिल्ह्यात यंदा उन्हाळी हंगामात १ हजार ६१२ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली होती.
भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी दत्ता कुलकर्णींची दुसऱ्यांदा वर्णीभारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी पुन्हा दत्ता कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. कुलकर्णी यांनी 2016 ते 19 च्या दरम्यान तब्बल चार वर्ष जिल्हाध्यक्ष पद भूषवलं होतं.त्यादरम्यानच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या होत्या.आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर दत्ता कुलकर्णी यांच्या खांद्यावर अध्यक्ष पदाची जबाबदारी पक्षाने सोपवली आहे.
राज्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या वाढणार; नोव्हेंबरपर्यंत १,७५६ नव्या गाड्या सेवेतराज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा १०८ अधिक बळकट होणार आहे
नोव्हेंबरपर्यंत १,७५६ नव्या रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार आहेत. या आधुनिक रुग्णवाहिकांमध्ये बेसिक व अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट, निओनॅटल केअर युनिट, दुचाकी व बोट रुग्णवाहिका यांचा समावेश आहे.
आरोग्य विभागाने सुमीत एसएसजी व बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस यांच्याशी १० वर्षांचा करार केला आहे.
सुमारे १,६०० कोटींची गुंतवणूक असलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी पाच टप्प्यांत होणार असून,
पुणे जिल्ह्यात ८३ टँकर सुरू; पाणीटंचाईवर खासगी टँकरांचा आधारउन्हाची तीव्रता वाढल्याने आंबेगाव, जुन्नर, पुरंदर आदी सात तालुक्यांतील ८३ गावे व ४५७ वाड्या-वस्त्यांमध्ये ८३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यापैकी केवळ ६ टँकर सरकारी असून, ७७ खासगी टँकर वापरण्यात येत आहेत.
एक लाख ४२ हजार नागरिक व ५१ हजार जनावरांना या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या २८७ खेपा प्रस्तावित असून त्यापैकी २५३ खेपा पूर्ण झाल्या आहेत
रेल्वेच्या पुणे विभागात स्थानकावर प्रवाशांना WIFI सुविधामध्य रेल्वेच्या पुणे विभागाने आता तब्बल ७९ रेल्वे स्थानकांवर मोफत वाय- फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
पुणे विभागातील महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांना ही सुविधा रेल्वे प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहे. यामुळे त्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर आणि सोयीस्कर होत आहे.
विभागातील सर्व स्थानकांवर अशी सुविधा असावी, आणि त्याबाबतची जनजागृतीचे फलक रेल्वे प्रशासनाने स्थानकांवर लावावेत, अशीही मागणी प्रवाशांकडून केली जात आहे
राज्यात १२ हजार बॅलेसेमिया रुग्ण वाढल्याने मोफत सल्ला, नोंदणी आणि उपचारांची मोहीम सुरु करण्यात आलीयराज्यात सुमारे १२ हजार बॅलेसेमिया रुग्णांची नोंद झाली आहे रुग्णसंख्या वाढू नये म्हणून 'बॅलेसेमिया मुक्ती' अभियान राबवले जात आहे.
पुणे जिल्ह्यात ही १२०० रुग्ण असून, जिल्हा रुग्णालयात ६० जणांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागातर्फे रुग्णांना मोफत रक्त, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारखे उपचार तसेच ‘१०४’ क्रमांकावर मोफत सल्ला दिला जाणार आहे
पुणेकरांचा पीएमपी बसमधून प्रवास होणार आणखीन सुलभपीएमपीच्या ताफ्यात येणार एक हजार बस
पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर…
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या माध्यमातून ५००, तर पीएमआरडीएकडून ५०० बसची खरेदी केली जाणार आहे.
या बस १२ मीटर लांबीच्या असून, सीएनजीवरील आहेत. एका बससाठी ४८ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
हवामान बदलामुळे मुलांमध्ये विषाणूसंसर्ग, ताप, उलट्या, जुलाबाची लक्षणे; काळजी घेण्याचा आरोग्यतज्ज्ञांचा इशाराउन्हाळ्यात अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसाने हवामानात मोठा बदल झाला आहे. यामुळे लहान मुलांमध्ये विषाणुसंसर्गाचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या काही दिवसांत ताप, उलट्या आणि जुलाबाची तक्रार असलेल्या लहान मुलांमध्ये वाढ झाली. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा इशारा आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.
यंदा उन्हाळ्यात तापमानात मोठी वाढ झाली होती. त्यानंतर तापमानात अचानक घट होऊन ढगाळ हवामान झाले.
आता अवकाळी पाऊस सुरू असून, हवामान बिघडले आहे. अशा प्रकारचे हवामान हे विषाणूंच्या वाढीस पोषक ठरते.
त्यामुळे विषाणुसंसर्गाच्या रुग्णांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे.
लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने त्यांच्यात या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. लहान मुलांमध्ये ताप, उलट्या आणि जुलाब ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येत आहेत.