अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
esakal May 25, 2025 02:45 AM

पालघर, ता. २४ (बातमीदार) : राज्याचा शिक्षण विभाग आणि पालघर जिल्हा परिषदेने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया पारदर्शक आणि कार्यक्षमपणे राबवण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग) संगीता भागवत यांच्या आदेशाने परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर नोडल, तसेच सहाय्यक नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा स्तरावर एक नोडल आणि एक सहाय्यक नोडल अधिकारी, तसेच पालघर, मोखाडा, विक्रमगड, तलासरी, वाडा, वसई आणि डहाणू तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक नोडल आणि सहाय्यक नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. हे अधिकारी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही, याची खबरदारी घेतील. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. ३१ मेपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू असणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.