टी 20 नंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी कसोटी क्रिकेटला देखील रामराम ठोकला. दोघांनी दोन्ही फॉरमॅट मधून निवृत्ती घेतल्यानंतर आता विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची जोडी मैदानावर कधी दिसणार? याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे, पण सध्या चाहत्यांना या दोघांना मैदानावर पाहण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतीय संघ आयपीएल (IPL 2025) नंतर आता पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला रवाना झाले आहेत, जी मालिका ऑगस्टमध्ये संपणार आहे. (IND vs ENG)
यानंतर टीम इंडियाला बांगलादेश संघाशी टी 20 आणि वनडे मालिका खेळायची आहे. भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) संघातील बिघडलेल्या संबंधांमुळे ही मालिका रद्द होण्याच्या मार्गावर आहे. जर ती मालिका खेळली गेली तर रोहित विराट खेळताना दिसतील. पण जर ही मालिका रद्दच झाली, तर चाहत्यांना ऑक्टोबर पर्यंत वाट पाहावी लागेल. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारतासोबत वनडे मालिका खेळणार आहे, ज्या मालिकेचा विराट आणि रोहित शर्मा सुद्धा भाग असणार आहेत.