Latest Maharashtra News Updates : ऑटोमॅटिक डोअर सिस्टिमच्या नव्या लोकल आणणार- रेल्वे
esakal June 09, 2025 10:45 PM
ऑटोमॅटिक डोअर सिस्टिमच्या नव्या लोकल आणणार- रेल्वे Mumbai Live Update: मुंबईकडे जाणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनिट उशिरा

आज सकाळी झालेल्या दुख:द घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहे. डोंबिवली स्टेशनवर प्रवाश्यांची गर्दी झाली आहे.

कोंटा-एराबोरा रस्त्यावर दोंड्राजवळ प्रेशर आयईडी स्फोट,जवान जखमी

कोंटा-एराबोरा रस्त्यावर दोंड्राजवळ प्रेशर आयईडी स्फोट; सुकमा जिल्ह्यातील कोंटा विभागाचे एएसपी आकाश राव गिरीपुंजे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रेशर आयईडी स्फोटात काही इतर अधिकारी आणि जवानही जखमी झाले आहेत: आयजी बस्तर पी सुंदरराज

Mumbai Live Update: दिवा ते मुब्रा स्थानकादरम्यान प्रवासी खाली पडले

दिवा ते मुब्रा स्थानकादरम्यान प्रवासी खाली पडले आहे. या घटनेत ५ जणांचा मृत्यु झाला आहे.

Thane Live : पुष्पक एक्सप्रेसमधून 5 जण खाली पडले

दिवा ते कोपर दरम्यान पुष्पक एक्सप्रेसमधून 5 जण खाली पडले असून यातील काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Raigad Live : तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर हजारो शिवभक्त पोहोचले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने दुर्गराज रायगडावर हजारो शिवभक्त दाखल झाले आहेत

Pune Live : पुण्यात टोळक्याकडून दोघा तरुणांवर कोयत्याने वार,चौघांना अटक

टोळक्याने दहशत माजवीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. शिवाजीनगर न्यायालयासमोरील तोफखाना भागात शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चौघांना अटक केली असून, त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

Ichalkaranji News : इचलकरंजीतील प्रार्थनास्थळ बंद करण्याची हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

इचलकरंजी : कोल्हापूर मार्गावरील सोन्या मारुती मंदिराच्या मागील औद्योगिक वसाहतीमधील इमारतीतील प्रार्थनास्थळ बंद करण्यासाठी पोलिसांसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोहोचल्याने तणाव निर्माण झाला. या ठिकाणी सामूहिक प्रार्थनेसाठी नागरिक एकत्र येत असल्याने स्थानिकांना त्रास होत होता. या प्रकरणाची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना देण्यात आली होती. त्यांनी संबंधित प्रार्थनास्थळ बंद करण्याची मागणी केली.

Belgaum-Jamboti Route : बेळगाव-जांबोटी मार्ग पुन्हा बंद, कुसमुळी पर्यायी मार्ग खचला

खानापूर : खानापूर तालुक्यातील कुसमुळी येथील मलप्रभा नदीवर नवीन पूल बांधण्यात येत आहे. त्यासाठी वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे. पंधरा दिवसांपूर्वी पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पूल बंद करण्यात आला होता. त्यानंतर पुलावर ज्यादा पाईप घालून पर्यायी रस्ता पुन्हा चालू करण्यात आला होता. मात्र, रविवारी (ता. ८) सायंकाळी सहाच्या सुमारास पर्यायी रस्ता पुन्हा पाण्याच्या प्रवाहामुळे खचल्याने बेळगाव-चोर्ला-गोवा अशी वाहतूक रविवारी सायंकाळपासून पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. सध्या दुचाकीसह सर्व वाहतुकींना निर्बंध घालण्यात आले आहेत.

Weather Update : राज्यात आज-उद्या वादळी वाऱ्यासह पाऊस; घाट भागात पावसाचा यलो अलर्ट

पुणे : राज्यातील कोकण व गोव्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम, तर काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांसह घाट भागात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. वाऱ्यांची (मान्सून) उत्तरी सीमा कायम असून, राज्यातील दि. ९ आणि १० जून रोजी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज दिला आहे.

Amit Shah : तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये आम्ही सरकार बनवू : गृहमंत्री अमित शहा

मदुराई : तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज व्यक्त केला. मदुराई येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी आज संवाद साधला. ‘‘तमिळनाडूतील भाजपचे कार्यकर्ते राज्यात सत्तेवर असलेल्या द्रमुकला पराभूत करतील. द्रमुकच्या भ्रष्ट कारभारामुळे तमिळनाडूतील गरीब, महिला आणि बालकांवर विपरीत परिणाम झाला आहे,’’ असा आरोप शहा यांनी केला. तसेच, द्रमुकने २०२१ च्या निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली का, याचे उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन यांना केले.

Kolhapur Water Supply : निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा आज, उद्या बंद राहणार

कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेतील काळम्मावाडी उपसा केंद्राची मॉन्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने सोमवार (ता. ९) व मंगळवारी (ता. १०) जवळपास निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ए, बी तसेच ई वॉर्डमधील सर्व भागांचे पाणी बंद राहणार असून, सी, डी वॉर्डमधील पाणीपुरवठा मात्र सुरू असेल.

Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उद्योगपती एलॉन मस्क यांना इशारा

वॉशिंग्टन : नव्या करविधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या खासदारांविरोधात निवडणूक लढविण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांना उद्योगपती एलॉन मस्क यांनी निधी पुरविल्यास त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. एका मुलाखतीदरम्यान ट्रम्प म्हणाले,‘‘मस्क यांनी आमच्या विरोधकांना निधी दिल्यास त्याचा त्यांना आर्थिक फटका बसेल. मस्क यांनी अध्यक्षीय कार्यालयाचाही अपमान केला आहे.’’ मस्क यांच्याबरोबर बिघडलेले संबंध सुधारण्याचा कोणताही विचार नसल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

Marathi Sahitya Sammelan : मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात भरणार सारस्वतांचा मेळा, शाहू स्टेडियमवर होणार संमेलन

Latest Marathi Live Updates 9 June 2025 : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मराठी साहित्याची पताका उंचावल्यानंतर आता एकेकाळची मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्यात सारस्वतांचा मेळा भरणार आहे. आगामी ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार असल्याची घोषणा झालीये. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार तिसऱ्या कार्यकाळातील पहिला वर्धापन दिन आज (ता. ९ जून) साजरा करणार असताना काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुली पत्रकार परिषद घेण्याचे आव्हान दिले आहे. तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज व्यक्त केला. थेट पाईपलाईन योजनेतील काळम्मावाडी उपसा केंद्राची मॉन्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने सोमवार (ता. ९) व मंगळवारी (ता. १०) जवळपास निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मराठा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात असून, येत्या २९ ऑगस्टला परत मुंबईवर धडक मारणार असल्याचे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येथे सांगितले. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.