Elon Musk: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरील वादात प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी आज मवाळ भूमिका घेतली. मागील आठवड्यात ट्रम्प यांच्याबाबत केलेल्या काही अतिशयोक्तीपूर्ण पोस्ट केल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे मस्क यांनी ‘एक्स’वरून म्हटले आहे. सरकारमधून बाहेर पडल्यानंतर मस्क यांनी ट्रम्प यांच्या काही धोरणांना जाहीरपणे विरोध केला होता.
मस्क यांच्या कंपन्यांचे सरकारी अनुदान आणि कंत्राटे रद्द करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिल्यावर मस्क यांनीही ‘स्पेसएक्स’चे उड्डाण रद्द करण्याची धमकी दिली होती. विरोधी पक्षाच्या उमेदवारांना निधी दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही ट्रम्प यांनी मस्क यांना दिला होता. हा वाद वाढत असतानाच मस्क यांनी आज मवाळ भूमिका घेत टोकाच्या विधानांबद्दल माफी मागितली आहे.