जेजुरी मोरगाव रोडवर भरधाव कारची पिकअप टेम्पोला धडक, भीषण अपघातात आठ जण ठार
Marathi June 19, 2025 08:24 AM

जेजुरी मोरगाव मार्गावर एका भरधाव वेगात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या पिकअप टेम्पोला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

बुधवारी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास या मार्गावरील श्रीराम ढाब्या समोर एक पिअप टेम्पोतून सामान उतरवले जात होते. त्यावेळी मागून येणाऱ्या एका भरधाव कारने टेम्पोला धडक दिली. या अपघातात टेम्पोतून सामान उतरवणारे दोघे, ढाब्यासमोर उभे असलेले तिघे आणि कारमधील तिघे जण ठार झाले. तर दोन मुलं, एक महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती देखील गंभीर असल्याचे समजते.

सोमनाथ रामचंद्र वायसे, रामु संजीवन यादव, अजय कुमार चव्हाण ,अजित अशोक जाधव , किरण भारत राऊत, अक्षय शंकर राऊत ,अश्विनी शंकर ऐसार अशी मृतांची नावे असून अद्याप एकाची ओळख पटलेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.