Outrage after the Vaishnavi Hagwane incident Asking for dowry even in the 21st century is shameful.
Marathi June 23, 2025 05:24 AM


पुणे येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता, तसेच गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात सासरच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून अनेक महिलांनी टोकाचं पाऊल उचलले.

Pune : पुणे येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात होता, तसेच गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात सासरच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून अनेक महिलांनी टोकाचं पाऊल उचलले. या घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या पुण्यात आजही महाराष्ट्राची लेक हुंड्याच्या कारणावरुन आत्महत्या करते यासारखी दुर्दैवी घटना नाही. एकवीसाव्या शतकात हुंड्याबद्दल आपल्याला भाष्य करावे लागत आहे, ही खंत आहे. त्यासाठी हुंडा मुक्त महाराष्ट्र कसा होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे अस त्या म्हणाल्या. (Supriya Sule: Outrage after the Vaishnavi Hagwane incident Asking for dowry even in the 21st century is shameful.)

लग्नात गाडी दिसली तर लगेच विचारायचं…

जुलै महिन्यापासून पुढील एक वर्षे संपूर्ण शाळा कॉलेज संस्था मिळून पूर्ण ताकदीने हुंडा विरोधी मोहीम आपल्याला महाराष्ट्रात चालवयाची आहे.आपण जेव्हा लग्नाला जातो तर तिथे आधी विचारायचं हुंडा घेतला का? किंवा दिला का? त्याने सांगितले हो तर आपण त्या लग्नाला जायचं नाही. लग्नाचा रुखवत दाखवतात. तिथं गाडी दिसली तर विचारायचं कोणाच्या नावावर आहे कोणी दिली? आता जी घटना पुण्यात झाली, त्या हगवणे कुटुंबाचे आमचे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध पण, आज सुशिक्षित कुटुंब, सुना अशा घरातुन जर माहेरी गेल्या तर सारखं माहेरून येताना गाडी घेऊन ये, मला ऐकून धक्काच बसला काय नाही घेऊन आली तर दीड लाख रुपयाचा मोबाईल घेऊन ये, अरे तुला मोबाईलवर बोलायचं आहे तर तू तुझ्या हिमतीवर घे सासऱ्याला कशाला सांगतोय मोबाईल पाहीजे, तसेच आपणही आपल्या मुलीला नाही म्हणायला शिकवल पाहिजे, मुलगा कितीही चांगला असेल तरीही…कारण जो मुलगा हुंडा मागतो तो मुलगा चांगला नाही. अस मत त्यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 8 मार्चला महिला दिन असतो, पण 22 जूनला आम्ही हा कार्यक्रम करतो, देशात पहिल्यांदा याच दिवशी महिला धोरण राबविण्यात आले होते, निर्णय प्रक्रियेत त्या आल्या होत्या. सायबर क्राइम हा त्या वेळी विषय नव्हता, कारण त्यावेळी मोबाईल नव्हता. आता मोबाईलमुळे महिलांच्या बाबतीत अनेक क्राइम वाढले आहेत. यात सायबर क्राईम हा मुद्दा वाढवला. आता DBT चे पैसे थेट महिलांच्या खात्यात येतात आधी ते नव्हते.

महिलांचे सामाजिक परिवर्तन झाले का?

लाडकी बहीण योजनेमुळे पैसे मिळाले पण सामाजिक परिवर्तन झाले का? महिलांच्या आयुष्यात काय बदल झाला? त्यांना किता मान सन्मान मिळाला? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, मी सरकारवर टीका करत नाही, 2100 रुपये कधी देणार त्यांना वाटेल तेव्हा, जसे शेतकरी कर्जमाफीला म्हणतात, वेळ येईल तेव्हा देऊ याला साडेचार वर्ष जातील त्यांची वेळ यायला. महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सरकार माध्यमातून निधी दिला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना व्यवसाय देऊन त्यांच्या मालाला मार्केट पण दिलं पाहिजे, इच्छाशक्ती आणि सामाजिक परिवर्तन फक्त निवडणुकीपुरतं नको, असंही पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या.


हेही वाचा…New Education Policy : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत नेमके काय धोरण? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.