भास्कर जाधवांवर बोलण्याची रामदास कदम यांची लायकी नाही. डोळ्याला बाम लावून रडणाऱ्या बामदासने स्वतःच्या मुलाला मंत्रिपद मिळावे म्हणून जी वारंवार नौटंकी केली त्यांना भास्कर दादा सारख्या स्वाभिमानी नेतृत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. असं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.
रामदास कदमांचा भास्कर जाधवांवर हल्लाबोलशिवसेनेचे गटनेते रामदास कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे सुरत गेले तेव्हा भास्कर जाधवही सुरूतपर्यंत आले होते. मात्र शिदेंनी त्यांना तुम्ही येवू नका, असं सांगितलं होतं. आता भास्कर जाधव नौटंकी करत आहेत. उद्धव ठाकरेंकडे जाऊन चूक केली असं ते म्हणत आहेत. मात्र आता गुहागरची जनताच त्यांना संन्यास देणार आहे.
पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव मिळणार?पुणे शहरामध्ये हिंदुत्वाचा चेहरा म्हणून राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी या केल्या काही दिवसांपासून समोर येताना पाहायला मिळत आहेत. अशातच आता कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. मेधा कुलकर्णी यांच्या या मागणीमुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या भाषेंबाबत दादा भुसेंनी स्पष्टच सांगितलंतिसऱ्या भाषेसंदर्भात जो शासन निर्णय घेतला आहे, त्यामध्ये तिसऱ्या भाषेच्या संदर्भात कुठेही अनिर्वाय शब्द नाही. तिसरी भाषा विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना जी अपेक्षित असेल ती निवडण्याबाबतचे अधिकार त्यांच्यावर सोपवलेले आहेत. पहिली दुसरीतील विद्यार्थ्यांना बडबड गीतांतून भाषा शिकवली जाते, ती कुत्सित पद्धतीने नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदेश देतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल, मराठी भाषेला कमी लेखन हा उद्देश नाही. असं मंत्री दादा भूसे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.