मुंबई : विधिमंडळ सभागृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांच्यात शिवीगाळ झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याची चर्चा विधानभवन परिसरात होत आहे. काही दिवसांपूर्वीच जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad) यांनी विधानभवनात जात असताना रेड कार्पेटरवरच नाव न घेता घोषणाबाजी करत गोपीचंद पडखळकरांना डिवचलं होतं. आता, या घटनेचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अशातच आज जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंड पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांजवळच दोघांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, या पायऱ्यांवरील मारहाणीचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला. अनेक आमदारांनी चिंता व्यक्त केली आहे. विधानभवनात येताना अडचणी येत असल्याचे आमदार सना मलिक यांनी आरोप केला आहे.
पहिल्यांदा पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आम्हाला याच्यापेक्षा जास्त पुरावा देण्याची गरज नसल्याचे आव्हाड म्हणाले. जर तुम्ही विधानसभेत गुंडाना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर कोणतेच लोक सुरक्षीत नाहीत असे आव्हाड म्हणाले. मला शिव्या दिल्या आहेत. कुत्रा, डुक्कर, तुला मारुन टाकू अशा धमक्या दिल्याचे आव्हाड म्हणाले. मलाच मारण्यासाठी सगळे आले होते असा आरोप आव्हाड यांनी केला. विधानसभेत आमदार सुरक्षीत नसतील तर कशाला राहायचं आमदार? असा संतप्त सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=-zt5nfa0mci
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा