Shravan 2025: श्रावणात उपवास का करतात?
Marathi July 17, 2025 10:25 PM

हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. या महिन्यात महादेवाची पुजा करण्यात येते. अभिषेक, विधिवत पूजा, फळे – फुले अर्पण केली जातात. संपूर्ण देशात श्रावण महिना मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रावण महिन्यात बहुतेकजण उपवास करतात. पण, यामागचे कारण काय? आरोग्याच्या दृष्टीने श्रावण महत्वाचा का असतो? श्रावणात ऊन-पावसाचे वातावरण असते. त्यामुळे थंडाव्यासोबत वातावरणात आर्द्रता वाढायला सुरुवात होते. वातावरणात आर्द्रता वाढली की शरीराच्या विविध तक्रारी सुरु होतात. खरं तर, आर्द्रतेमुळे पचनसंस्था कमकुवत झालेली असते. परिणामी, पोटाच्या तक्रारी जाणवतात. त्यामुळे श्रावणात उपवास करणे योग्य मानले जाते. श्रावणात उपवास केल्याने शरीराला कसा फायदा होतो, पाहुयात

उपवास करण्याचे फायदे –

  • श्रावण महिना महादेवाचा आवडता महिना आहे. असे सांगितले जाते की, या महिन्यात उपवास केल्याने महादेवाची कृपा आपल्यावर राहते.
  • श्रावणात उपवास केल्याने अनेक पटींनी पुण्य मिळते, असे मानले जाते.
  • श्रावणात उपवास केल्याने आरोग्यासाठी अद्भूत फायदे होतात.
  • उपवासामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारते.
  • उपवास केल्याने शरीराचे वजन नियंत्रणात राहते.
  • उपवासामुळे मानसिक ताण कमी होतो.
  • शरीराला विश्रांती मिळण्यासाठी उपवास करणे फायद्याचे मानले जाते.

उपवास करताना पाळा हे नियम –

  • श्रावणात उपवास करताना साधं आणि हलकं जेवण घ्यावे.
  • तुम्ही फळे,दूध, साबुदाणा, राजगिरा यांचा समावेश असतो.
  • कांदा, लसूण आणि मांसाहार टाळावा.
  • दिवसभर पुरेसे पाणी प्यावे.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=9ppr0j5htju

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.