सोन्याचे चांदीचे दर: सोन्या चांदीची (Gold Silver Rate) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज (17 जुलै) गुरुवारी देशात सोन्याच्या किंमती घसरण झाली आहे. आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 90990 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 99270 रुपये आहे. 100 रुपयांच्या घसरणीसह, चांदीचा भावही 113900 रुपये प्रति किलोवर आला आहे.
मुंबईहैदराबाद, चेन्नई, बंगळुरु आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 90990 रुपये दराने विकले जात आहे. त्याच वेळी, येथे 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 99270 रुपये आहे. अहमदाबाद आणि पटना येथे सोन्याचा दर आज सारखाच आहे. येथे 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे 91100 रुपये आणि 99380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जयपूरमध्ये, प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 91150 रुपये आहे, तर त्याच ग्रॅमच्या 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 99480 रुपये आहे.
जूनमध्ये भारताची सोन्याची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी घसरून दोन वर्षांहून अधिक काळातील सर्वात कमी पातळीवर पोहोचली आहे. किमतींमध्ये झालेल्या विक्रमी वाढीमुळे मागणीत घट झाली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असलेल्या भारताची आयात 21 टनांवर घसरली आहे, जी एप्रिल 2023 नंतरची सर्वात कमी आहे. जूनमध्ये सोन्याची आयात गेल्या वर्षीच्या 2.48 अब्ज डॉलर्सवरून 1.84 अब्ज डॉलर्सवर आली आहे. गेल्या दहा वर्षांत भारताने जूनमध्ये सरासरी 52.4 टन सोने आयात केले आहे. व्यापार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2025 च्या पहिल्या सहामाहीत भारताची सोन्याची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमी होऊन 204.01 टन झाली आहे, जी 2020 च्या पहिल्या सहामाहीत कोरोना साथीमुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतरची सर्वात कमी आहे.
दरम्यान, सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहा.यला मिळत आहे. त्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. अनेकांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहबे. अशातच आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाल्यामुळं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा