तमाम मराठी माणसांसाठी राज ठाकरेंचा महामंत्र… म्हणाले, तुम्ही कुठेही जा.. रिक्षा असो की टॅक्सी, फक्त…
GH News July 19, 2025 12:10 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मीरा रोड येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी मराठी विरुद्ध हिंदी वादावर भाष्य केलं. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मराठी माणसांसाठी एक महामंत्र सांगितला आहे. कुठेही गेलं तरी या मंत्राचा वापर करा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.

माज घेऊन कोणी आला तर ठेचायचा म्हणजे ठेचायचा – राज ठाकरे

राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, ‘महाराष्ट्राची बाजू समजून घेतली पाहिजे. सव्वाशे वर्ष राज्य केलं आहे. महाराजांची घोषणा काय होती. हे हिंदूवी स्वराज्य व्हावे ही नव्हती. हिंदवी स्वराज्य व्हावं ही होती. हिंद प्रांत आमचा असावा. कुणी सरकार स्थापन करू नये. आम्ही राज्य करणार. आम्ही कुणाचे गुलाम राहणार नाही. मराठीशाहीने राज्य केलं. अटकेपार झेंडे फडकावले. तिथपर्यंत पोहोचले होते मराठे. तो महाराष्ट्र हतबल आहे. तो महाराष्ट्र भिका मागत आहे. तुम्ही या महाराष्ट्राचे राजे. तुम्ही या महाराष्ट्राचे मालक. बाकीचे लोकं बाहेरून आली. त्यांच्यासमोर आम्ही हतबल होणार आणि नही नही भाई…का? स्वत:हून काही करायची गरज नाही. पण अशा प्रकारे माज घेऊन कोणी आला तर ठेचायचा म्हणजे ठेचायचा.’

राज ठाकरे कुणाशीही तडजोड करणार नाही…

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘तुमच्या मनात विष कालवणं सुरू आहे. हे आतून सर्व एक आहे. कशाचा कशाला संबंध नाही. कुणाशी माझी मैत्री असो, दुश्मनी असो. काहीही असो. महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी भाषेबाबत राज ठाकरे कुणाशीही तडजोड करणार नाही. या आधी केली नाही. पुढेही करणार नाही. तुम्हीही महाराष्ट्रात राहिलं पाहिजे,. जगलं पाहिजे.

राज ठाकरेंनी दिला महामंत्र

मराठी माणसांना महामंत्र देताना राज ठाकरे म्हणाले की, ‘माझं मराठी माणसांना सांगणं आहे. जिथे जाल, दुकान, बस, टॅक्सीत जाल तिथे कायम स्वरुपी समोरच्या व्यक्तीशी फक्त मराठीत बोला. त्याला मराठीत बोलायला भाग पाडा. कुणाला काय वागायचं ते वागू द्या. तुम्ही खंबीर राहा. तुम्ही घट्ट राहा. खडकासारखे टणक राहा. कुणीही आत शिरणार नाही. आजूबाजूला लक्ष ठेवा. कोण आत येतो आणि जातो. एवढंच सांगतो सतर्क राहा, सतर्क राहा. सतर्क राहा…

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.