ENG vs IND : इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, पावसामुळे 50 ऐवजी 29 ओव्हरचा गेम, टीम इंडियाची बॅटिंग
GH News July 19, 2025 10:08 PM

इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. वूमन्स टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसऱ्या सामना नियोजित वेळेनुसार आज 19 जुलैला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणं अपेक्षित होतं. मात्र पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे तब्बल 4 तासांचा खेळ वाया गेला. त्यामुळे हा सामना पूर्ण 50 ओव्हरचा होणार नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

उभयसंघातील दुसऱ्या सामन्याला सुधारित वेळनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. इंग्लंड कर्णधार नॅट सायव्हर ब्रँट हीने फिल्डिंगचा निर्णय घेत भारतीय संघाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

इंग्लंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : टॅमी ब्युमाँट, एमी जोन्स (विकेटकीपर), एम्मा लॅम्ब, नॅट सायव्हर-ब्रंट (कॅप्टन), सोफिया डंकले, मायिया बौचियर, एम अर्लॉट, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, लिन्से स्मिथ आणि लॉरेन बेल.

इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), अरुंधती रेड्डी, स्नेह राणा, श्री चरणी आणि क्रांती गौड.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.