थायलंडचं मसाज जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातून लोक या देशाचं सौंदर्य पाहण्यासाठी येतात. पर्यटन हे या देशातील उत्पन्नाचं सर्वात मोठं साधन आहे. परंतु, अनेक पर्यटक येथील महिलांच्या सौंदर्यात अडकतात आणि बेकायदेशीर खंडणीचे बळी ठरतात. येथील महिला आपल्या सौंदर्याच्या जोरावर पर्यटकांना घायाळ करतात आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळतात. थायलंड येथे अशी एक महिला आहे जिला अटक झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. महिला थायलंड येथे आलिशान आयुष्य जगते. आलिशान बंगल्यात संबंधित महिला राहते. बंगल्यात अनेकांचं येणं-जाणं असल्यामुळे पोलिसांना संशय आला आणि महिलाच्या घरावर धाड टाकण्यात आली.
छाप्यादरम्यान, महिलेच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये अनेक लोकांचे सुमारे 80 हजार नग्न फोटो आढळले. तपासादरम्यान, पोलिसांना असं आढळून आलं की, महिलीने एका वर्षात 102 कोटींहून अधिक रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावले आहेत.
सांगायचं झालं तर, थायलंडमध्ये एका मोठ्या लैंगिक आणि खंडणी प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला अनेक बौद्ध भिक्षूंसोबत लैंगिक संबंध ठेवत होती, नंतर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ गुप्तपणे काढायची आणि त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळत होती.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, तिने बौद्ध भिक्षूंना लैंगिक संबंध ठेवण्यास प्रलोभन दिलं आणि नंतर त्यांनां पैशासाठी ब्लॅकमेल केले. रॉयल थाई पोलिसांच्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, महिलेसोबत नऊ मठाधिपती आणि वरिष्ठ भिक्षूंसोबत शारीरिक संबंध होते. पोलिस अधिकाऱ्यांना तिच्या फोनवर इतर बौद्ध नेत्यांशी संबंधित मेसेज आणि खाजगी व्हिडिओ सापडले. तपासात आणखी एक मोठी गोष्ट समोर आली आहे, ब्लॅकमेलमधून मिळालेले पैसे महिलेने ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी वापरले होते.
रिपोर्टनुसार, महिलेचं नाव विलावान एम्सावत असं असून ती 35 वर्षांची आहे. गेल्या तीन वर्षात महिलेने 385 मिलियन डॉलर म्हणजे 102 कोटी रुपये कमावले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बौद्ध भिक्षूंसोबत शारीरिक संबंध ठेवताना महिलेचे जवळपास 80 हजार फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. विलावान फोटो आणि व्हिडीओचा उपयोग बौद्ध भिक्षूंकडून पैसे उकळवण्यासाठी करत होती.
थायलंडमधील अनेक प्रसिद्ध बौद्ध मठ आणि मंदिरांच्या मठाधिपतींसह नऊ भिक्षूंना पदच्युत करण्यात आले आहे आणि किमान दोन भिक्षूंना घरीच राहण्यास भाग पाडण्यात आलं आहे. समितीने भिक्षूंसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या महिलांवर फौजदारी खटला चालवण्याची परवानगी देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, या कल्पनेमुळे पुरुषांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरले पाहिजे असे म्हणणाऱ्यांना राग आला आहे.