शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. या आठवड्यात 10 कंपन्यांचे IPO येणार आहेत. यात गुंतवणूक करुन तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. हे आयपीओ कोणते आहेत, ते किती तारखेला खुले होणार? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इंडिक्यूब स्पेसेस आयपीओ
हा आयपीओ 23 जुलै 2025 रोजी खुला होणार आहे. इंडिक्यूब स्पेसेस कंपनी आयपीओद्वारे 700 कोटी रुपये उभारणार आहे. यातील 650 कोटी रुपयांचा नवीन इश्यू असेल तर 50 कोटी रुपयांचे ओएफएस शेअर असतील. या आयपीओचा प्राइस बँड 225 ते 237 रुपये असणार आहे.
जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओ
हा आयपीओ 23 जुलै 2025 रोजी खुला होणार आहे. कंपनी याद्वारे 460 कोटी रुपये उभारणार आहे. यात 400 कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणि 60 कोटी रुपयांचा ओएफएस समाविष्ट आहे. या आयपीओचा प्राइस बँड 225 ते 237 रुपये असणार आहे.
ब्रिगेड हॉटेल व्हेंचर्स आयपीओ
हा आयपीओ 24 जुलै रोजी खुला होणार आहे. या आयपीओमध्ये 759.60 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जाणार आहेत. या आयपीओचा प्राइस बँड अद्याप जाहीर झालेला नाही.
शांती गोल्ड इंटरनॅशनल आयपीओ
शांती गोल्ड इंटरनॅशनल आयपीओ 25 जुलै रोजी येणार आहे. या आयपीओद्वारे 1,80,96,000 नवीन इक्विटी शेअर्स इश्यू केले जाणार आहेत. यात कोणतीही ऑफर-फॉर-सेल नाही. याचा प्राईस बँडही काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
अँथम बायोसायन्सेस आयपीओ
अँथम बायोसायन्सेसचा आयपीओ सोमवार, 21 जुलै 2025 रोजी येणार आहे. चांगल्या सबस्क्रिप्शननंतर ग्रे मार्केटमध्ये याचा प्रीमियम देखील वाढत आहे.
5 एसएमई आयपीओ
पुढील आठवड्यात एसएमई प्रकारात 5 कंपन्या पदार्पण करणार आहे. सॅव्ही इन्फ्रा अँड लॉजिस्टिक्स आणि स्वस्तिका कॅसलचा आयपीओ 21 जुलै 2025 रोजी येणार आहे. मोनार्क सर्व्हेअर्स अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट्सचा आयपीओ 22 जुलै 2025 रोजी उघडणार आहे. तसेच टीएससी इंडियाचा आयपीओ 23 जुलै 2025 रोजी येणार आहे. पटेल केम स्पेशालिटीजचा आयपीओ 25 जुलै 2025 रोजी बाजारात पदार्पण करणार आहेत. स्पनवेब नॉनवोव्हन्स आणि मोनिका अल्कोबेव्हचे आयपीओ 21जुलै आणि 23 जुलै रोजी बीएसई एसएमई आणि एनएसई एसएमईवर पदार्पण करणार आहेत.