भर समुद्रात जहाजाला भीषण आग, प्रवाशांत एकच खळबळ!
GH News July 20, 2025 09:16 PM

Ship Fire In Indonesia : अथांग समुद्रात कधी काय होईल हे सांगता येत नाही. समुद्रात आतापर्यंत अनेक महाकाय जहाज बुडलेले आहेत. तांत्रिक किंवा अन्य एखाद्या अडचणीमुळे जगभरातील काही प्रसिद्ध अशा जहाजांसोबत अपघात झालेले आहेत. यात टायटॅनिक या जहाजाचाही समावेश आहे. एकदा अपघात झाल्यानंतर जहाज कितीही मोठे असले तरी समुद्र त्याला गिळंकृत करतोच. असाच काहीसा प्रकार सध्या समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार इंडोनेशित एका जहाजासोबत मोठा अपघात झाला आहे. या जाहाजाला मोठी आग लागल्याचे समोर आले आहे.

अनेक प्रवाशांची थेट समुद्रात उडी

घडलेला हा प्रकार इंडोनेशियातील आहे. तिथे एका प्रवासी जहाजाला आग लागली आहे. आगीची ही घटना घडल्यानंतर अनेक प्रवाशांनी थेट समुद्राच्या पाम्यात उडी घेतली आहे. आग लागलेल्या या जहाजाचे नाव केएम बार्सिलोना व्हीए असे आहे. ही दुर्घटना उत्तर सुलावेसीच्या तालिस बेटाजवळ घडली आहे. या जहाजाला आग लागताच त्यातील प्रवाशांनी लाईफ जॅकेट घालून थेट समुद्रात उडी घेतली आहे. प्रवासी उडी घेतानाचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

आग लागलेल्या जाहाजात लहान मुलांचाही प्रवास

या जहाजात 280 पेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. पाण्यातून जात असताना या जहाजाला अचानक आग लागली. आगीची घटना समजताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर काही प्रवाशांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी थेट समुद्रात उडी घेतली. या जहाजात काही लहान मुलंदेखील आपल्या पालकांसोबत प्रवास कत होती. ही घटना घडल्यानंतर लगेच इंडोनेशियाच्या बचावकार्य पथकाने घटनास्थळी धाव घेत लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मोहीम राबवली. या जाहाजाला आग का लागली? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र या दुर्घटनेमुळे काही लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ व्हायरल

ही दुर्घटना होताच सोशल मीडियावर आगीने वेढलेलेल्या जहाजाचे व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये काही प्रवासी घाबरत समुद्रात उडी घेताना दिसत आहेत. काही लोकांनी तर लाईफ जॅकेटही घातलेले दिसत नाहीये.

लोकांना नेमकं कसं वाचवलं?

दरम्यान, प्रवासी जहाजाला आग लागली तेव्ही त्याच भागात एक मासे पकडणारे जहाज होते. या जाहाजाने पाण्यात उडी घेतलेल्या लोकांचे प्राण वाचवले. तर दुसरीकडे व्हायरल व्हिडीओत लोक आग लागलेल्या जहाजात आम्हाला मदत करा असे ओरडताना दिसत आहेत.

दरम्यान, भर समुद्रात घडलेल्या या घटनेनंतर आता सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.