ENG vs IND : चौथ्या सामन्याआधी माइंड गेम, या दिग्ग्जाचा संघात समावेश, टीम इंडियाच्या अडचणीत वाढ!
GH News July 22, 2025 08:14 PM

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. उभयसंघातील चौथ्या सामन्याला बुधवार 23 जुलैपासून सुरुवात होणार आहे. सामन्याचं आयोजन हे मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात करण्यात आलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सामन्याच्या 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हनमध्ये जाहीर केली. बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर दुखापतग्रस्त शोएब बशीर याच्या जागी लियाम डॉसन याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडने अशाप्रकारे प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर आली आहे. इंग्लंडच्या गोटात दिग्ग्जाचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट टीमने मेंटल स्किल सुधारण्यासाठी गिल्बर्ट एनोका यांचा समावेश केला आहे. गिल्बर्ट एनोका हे ऑल ब्लॅक्सचे माजी मेंटल स्किल कोच राहिले आहेत. तसेच गिल्बर्ट काही महिन्यांपूर्वी इंग्लंड संघासह होते.

गिल्बर्ट एनोका कोण आहेत?

इंग्लंड टीम इंडिया विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात प्रतिष्ठेची अॅशेस सीरिज खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही मालिकेत खेळाडू मानसिकरित्या भक्कम असणं गरजेचं आहे. त्यासाठीच गिल्बर्ट एनोका यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडचा हेड कोच ब्रँडन मॅक्युलम आणि गिल्बर्ट हे दोघे मित्र आहेत. गिल्बर्ट यांनी याआधी अनेक संघ आणि क्लबसाठी योगदान दिलं आहे. गिल्बर्ट 1998 ते 2004 या दरम्यान न्यूझीलंडचे मेंटल स्किल कोच राहिले. त्यामुळे आता इंग्लंडला गिल्बर्ट यांचा सोबत असण्याचा विजय मिळवण्यात किती फायदा होतो? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

चौथा सामना कोण जिंकणार?

दरम्यान उभयसंघातील चौथा सामना हा मालिकेच्या दृष्टीने आणि दोन्ही संघांच्या हिशोबाने अतिशय महत्त्वाचा आहे. इंग्लंड या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडकडे मँचेस्टरमध्ये विजय मिळवत मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतासमोर मालिकेत कायम राहण्यासाठी या सामन्यात विजय मिळवण्याचं आव्हान आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यात दोन्ही संघात चुरस पाहायला मिळू शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.