शुबमन गिल याच्या नेतृत्वात मेन्स टीम इंडिया 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडिया टी 20I नंतर आता एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहे. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वूमन्स टीम इंडिया 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांकडे मालिका जिंकण्याची बरोबरीची संधी आहे. उभयसंघातील तिसऱ्या आणि अंतिम सामन्याचं आयोजन हे आज 22 जुलै रोजी रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट येथे करण्यात आला आहे.
उभयसंघातील तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 5 वाजता टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामन्यासह मालिका जिंकण्यासाठी भारताचा इंग्लंडसमोर जास्तीत जास्त धावांचा आव्हान ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.
इंग्लंड वूमन प्लेइंग ईलेव्हन : टॅमी ब्यूमोंट, एमी जोन्स (विकेटकीपर), एम्मा लॅम्ब, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफिया डंकले, अॅलिस डेव्हिडसन रिचर्ड्स, चार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्सी स्मिथ, लॉरेन फाइलर आणि लॉरेन बेल.
टीम इंडिया वूमन प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, प्रतीका रावल, हर्लीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा, श्री चरणी आणि क्रांती गौड.