WCL 2025 स्पर्धेत मोठा ट्विस्ट! पाकिस्तानकडून भारतीय संघाची कोंडी करण्याचा प्रयत्न, झालं असं की…
GH News July 22, 2025 08:14 PM

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेत भारताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला. त्यामुळे हा सामना रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आहे. त्यामुळे पाकिस्तानची दहशतवादाची छबी जगभराच्या पटलावर पुन्हा एकदा समोर आली. त्यामुळे पाकिस्तान संघाचा जळफळाट झाला आहे. 20 जुलै रोजी बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियमवर इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स संघ एकमेकांसमोर येणार होते. पण या सामन्याच्या एक दिवस आधी इरफान पठाण, हरभजन सिंग, युसूफ पठाण, सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी खेळण्यास नकार दिला. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना रद्द करण्याची वेळ आली. हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळणार असं गृहीत धरलं जात होतं. पण पाकिस्तानने गुण शेअर करण्यास मनाई केली आहे.आम्ही मैदानात उतरण्यास तयार होतो. दरम्यान, इंडिया चॅम्पियन्स संघाने सामन्यातून माघार घेतली आहे. म्हणून, पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचे मालक कामिल खान यांनी आम्हाला पूर्ण गुण देण्याची एकमागणी केली.

कामिल खान यांच्या मते, इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यातील सामना रद्द होण्याचे मुख्य कारण भारतीय खेळाडू आहेत. सामना रद्द करण्यात आला कारण त्यांना खेळायचे नव्हते. यात पाकिस्तान संघाचा कोणताही दोष नाही. सामना पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे रद्द झाला नाही. त्यामुळे गुण शेअर करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आयोजकांपुढे मोठा पेच निर्माण झाला. अखेर पाकिस्तानला 2 गुण दिल्याचं वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेवरून दिसत आहे. मात्र याबाबत अधिकृत असं काही सांगितलेलं नाही.

वर्ल्ड चॅम्पियनशिप लीजेंड्सच्या गुणतालिकेनुसार, पाकिस्तानला हा सामना रद्द झाल्याने विजयी घोषित करण्यात आल्याचं दिसत आहे. कारण पाकिस्तानच्या खात्यात 2 गुण जमा झाल्याचं दिसत आहे. तसचे नेट रनरेट हा +.250 असून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहेत. दक्षिण अफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर असून 2 गुणांसह नेट रनरेट हा 2 आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खात्यात प्रत्येकी एक गुण आहे. तर वेस्ट इंडिने एक सामना गमावल्याने खात्यात 0 गुण आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना रद्द झाल्याने त्याच्या खात्यात काहीच नाही. ना सामना खेळल्याची नोंद, ना पराभवाची नोंद, ना रनरेटची नोंद आहे. त्यामुळे पाकिस्तानला दोन गुण मिळाल्याचं सध्या तरी चित्र आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.