वेध गणेशोत्सवाचे--लोगो
-rat१०p४०.jpg-
२५N८३५०१
संगमेश्वर ः नावडी येथील प्रशांत सुर्वे यांच्या चित्रशाळेत आकाराला येणारी गणेशमूर्ती.
------
हस्तकौशल्यातून साकारतात गणरायन
कलाकार प्रशांत सुर्वे ; नावडीतील गणेश चित्रशाळेत लगबग
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ ः संगमेश्वर येथील नावडी भंडारवाडी येथे राहणारे सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार प्रशांत सुर्वे यांच्या चित्रशाळेत सध्या गणेशमूर्ती कामाची लगबग सुरू आहे. सुर्वे यांच्या गणेशमूर्ती चित्रशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व मूर्ती हस्तकौशल्यातून साकार करतात.
प्रशांत सुर्वे यांचे मूर्ती कलेचे शिक्षण १५ वर्षे नंदकुमार भाटकर भाट्ये यांच्याकडे घेतले. त्यानंतर २००७ साली त्यांनी संगमेश्वर भंडारवाडी येथे आपल्या राहत्या घरी गणेश चित्रशाळेला प्रारंभ केला. आई (कै.) जयमाला जगन्नाथ सुर्वे व वडील (कै.) जगन्नाथ मुकुंद सुर्वे यांच्या त्यावेळच्या पाठबळामुळे जीवनात पुढे जाण्याचा मार्ग प्रशांत यांना मिळाला.
सुरुवातीला दोन गणपती चित्रे काढून शाडू माती व रंग कलेला सुरुवात केली. मेहनत, जिद्द, आवड व चिकाटी या गुणांच्या जोरावर व उत्तर सहचारिणी पत्नी सौ. प्राप्ती यांच्या सहकार्यामुळे पुढे चित्र शाळेत गणपती मूर्तीच्या ऑर्डर येऊ लागल्या. ग्राहकांच्या आवडीप्रमाणे सांगतील त्या कॅलेंडर, चित्र याप्रमाणे प्रशांत सुर्वे ग्राहकांना रेखीव मूर्ती देऊ लागले. सध्या कारखान्यात कलाधिपती, कैलास पती, राजेशाही, लालबागचा राजा, स्वामी समर्थ, शिवपिंडीवर बेल वाहणारा, हत्तीच्या सोंडेला मिठी मारलेल्या आदी आगळ्यावेगळ्या मूर्ती आकर्षक व देखण्या मूर्ती साकारलेल्या आहेत. दोन ते चार फूट उंची पर्यंतच्या मूर्ती शाडू माती पासून हस्त कौशल्यातून घडवलेल्या दिसत आहेत.
----