Solapur News:'शिक्षकांची कागदपत्रे अपलोड करण्यास मुदतवाढ'; साेलापूर जिल्ह्यातील २१० शाळांमधील कागदपत्रे अपलोड नाहीत
esakal September 18, 2025 04:45 AM

सोलापूर : शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढीनुसार सर्व मुख्याध्यापकांना आता २० सप्टेंबरपर्यंत त्यांच्या शाळांमधील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शासनाला अपलोड करावी लागणार आहेत.

Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगा

नागपूर येथे बोगस शालार्थ आयडी घेऊन शासनाचा कोट्यवधी रुपयांचा पगार लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर असेच प्रकार अन्य जिल्ह्यांमध्ये देखील झाले असावेत असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाने अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंलडंवार यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती नेमली आहे.

तत्पूर्वी, सर्व अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता, रूजू अहवाल आणि शालार्थ आयडी आदेश, ही कागदपत्रे अपलोड करण्याचे बंधन घातले आहे. त्यासाठी सुरवातीला ३१ ऑगस्टपर्यंत, नंतर १५ सप्टेंबरपर्यंत आणि आता २० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासा

सर्व मुख्याध्यापकांनी आता मुदतीत कागदपत्रे अपलोड होतील, याची दक्षता घ्यावी असेही शिक्षण आयुक्तांनी मुदतवाढीच्या पत्रात नमूद केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अजूनही सुमारे २१० शाळांमधील तीन हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड झालेली नाहीत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.