'छोट्या पडद्यावर सध्या मोठ्या घडामोडी घडतायत. चॅनेलवरील मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतायत. तर त्याजागी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. गेल्या काही महिन्यात स्टार प्रवाह आणि झी मराठी या वाहिन्यांवर अनेक नवीन मालिका सुरू झाल्या. नुकतीच स्टार प्रवाहने एका मालिकेची घोषणा केली. अशातच आता झी मराठीवरील आणखी एक मालिका निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मालिकेतील अभिनेत्रीने एक पोस्ट केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलंय. तिची पोस्ट सध्या व्हायरल होतेय.
झी मराठीवरील 'शिवा' ही मालिका काही महिन्यांपूर्वीच संपली. आता त्यापाठोपाठ आणखी एक मालिका बंद होण्याची शक्यता आहे. ही मालिका आहे 'लाखात एक आमचा दादा'. ८ जुलै २०२४ रोजी झी मराठीवर सुरू झालेली ही मालिका अवघ्या दीड वर्षात निरोप घेणार असल्याचं दिसतंय. या मालिकेत काम करणाऱ्या ईशा संजय हिची पोस्ट सध्या व्हायरल होतेय. तिने मालिकेबद्दल भावुक पोस्ट शेअर केली आहे. ईशा या मालिकेत राजश्रीची भूमिका साकारतेय. ईशाने या पोस्टला, “राजश्रीच्या भूमिकेसाठी शेवटचं तयार होताना…” असं कॅप्शन दिलं आहे.
View this post on InstagramA post shared by I S H A (@ishaasanjay)
तिने लिहिलं, “मन खूप भरून आलंय…आणि आता फक्त आठवणी कायमस्वरुपी जवळ राहणार आहेत. डोळ्यांत पाणी आहे अन् हात थंड पडलेत. १ वर्ष ५ महिने झाले…आता राजूच्या ( राजश्री ) भूमिकेतून तुमचा निरोप घेते. लाखात एक आमचा दादा… Signing Off As Raju”. तिच्या पोस्टवरून आता ही मालिका संपणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. ही मालिका संपणार आहे की फक्त ईशा राजश्रीच्या भूमिकेचा निरोप घेणार आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र यंदाच्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात या मालिकेला एकही नॉमिनेशन मिळालेलं नाहीये. यावरून अनेकांनी ही मालिका संपणार असल्याचा अंदाज बांधला होता.
आता ही मालिका खरंच निरोप घेणार का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. याबद्दल झी मराठीने कोणतीही अधिकृत पोस्ट केलेली नाही.
VIDEO: एकदम कडक! सेनोरिटा गाण्यावर नम्रता संभेरावचा जबरदस्त डान्स; नवऱ्याचीही नजर हटेना