हल्ली फिटनेस आणि हेल्थ संदर्भात जागरुकता वाढलेली दिसत आहे. लोक सकस आहार आणि डाएडकडे वळत आहेत. आणि हे गरजेचे आहे कारण आहाराचा आरोग्य यांचा परस्पर संबंध असतो. परंतू काही लोक डाएटच्या नावाखाली कोणतेही कॉम्बीनेशन खातात. त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आरोग्या संदर्भात योग गुरु रामदेवबाबा जागृती करत असतात. रामदेव बाबा यांनी आयुर्वेदिक उपचाराचा प्रसार घरोघरी केला आहे. याच उद्देश्याने रामदेवबाबा यांनी पंतजलीची सुरुवात केली होती.
आयुर्वेदा संदर्भात जागरुकता करण्यासाठी आचार्य बाळकृष्ण यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. असेच एक पुस्तक ‘द सायन्स ऑफ आयुर्वेद’ या पुस्तकात कोण-कोणत्या पदार्थाचे मिश्रण तुमचे आरोग्य बिघडवू शकते. त्यांच्या सेवनाने पचन तंत्रावर काय प्रभाव होतो. तसेच टॉक्सिन्स देखील वाढू शकतात. यामुळे कोणते पदार्थांसोबत कोणते पदार्थ खाऊ नये हे जाणणे महत्वाचे आहे.त्यामुळे आपल्या शरीराचे नुकसान टळते. चला तर पाहूयात कोणत्या पदार्थांचे कॉम्बीनेशन चुकीचे ते पाहूयात..
‘द साइंस ऑफ आयुर्वेदा’ सांगितल्या नुसार आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर होत असतो. जेवताना काही पदार्थांनंतर चुकीचे पदार्थ आपण खात असतो त्याचा वाईट परिणाम होतो. उदा.दुधासोबत सलाड, दही, मासे वा सत्तू खाणे चुकीचे आहे. हे पदार्थ एकमेकांशी मेळ खात नाहीत. त्यामुळे शरीरात विषाक्त पदार्थ तयार होतात. त्यांना बाहेर काढणे कठीण होते. त्यामुळे पचन बिघडते. शरीरातील धातू असंतुलित होतात त्याने आजारी पडण्याची शक्यता वाढते. चुकीच्या आहारामुळे इम्युनिटी कमजोरी होते आणि थकवा, तणावासारखी समस्या असते. याशिवाय चुकीची वेळ, हवामान, जास्त थंड आणि जास्त गरम भोजन देखील आरोग्यावर परिणाम होतो. चला तर पाहूयात कोणते फूड कॉम्बीनेशन चुकीचे आहे ते पाहूयात..
दूधासोबत हे पदार्थ वर्ज्य – दूध हाडांच्या मजबूतीसाठी चांगले मानले जाते. परंतू काही पदार्थ दूधासोबत खाणे चुकीचे आहे. जसे दूधा सोबत दही खाऊ नये. याशिवाय मुळा,मुळ्याची पाने, कच्चा सलाड, शेवगा,चिंच, खरबुजा, बेल, नारळ, जिलेबी, तिळाचे लाडू, चण्याची डाळ, काळी उडद, आंबट फळे आदी.
दह्यासोबत काय खाऊ नये :– दह्याचा गुणधर्म थंड असतो. अशात दही सोबत गरम वस्तू खाऊ नये असे म्हटले जाते. तसेच पनीर आणि काकडीही दही सोबत खाऊ नये
भातासोबत हे पदार्थ टाळावेत – आयुर्वेदानुसार तांदळाचा भाता सोबत व्हीनेगर सेवन करु नये. भात आणि व्हीनेगर पचन यंत्रणा बिघडवू शकते. त्यामुळे पोटात जडजड वाटते. गॅस आणि पोट फुगणे सारख्या समस्या निर्माण होतात.
मधा सोबत काय खाऊ नये – मधासोबत काही पदार्थ खाऊ नयेत. यात गरम पाणी, गरम दूध, तेल, तूप आणि काळी मिर्ची. अनेकजण वजन घटवण्यासाठी गरम पाण्यासोबत मध पितात. परंतू आयुर्वेदानुसार गरम पाण्यात थेट मध टाकून पिऊ नये. असे केल्याने मधाचा पोषकपणा नष्ट होतो.
केळा सोबत ताक – आयुर्वेदानुसार केळ्या सोबत ताकाचे सेवन करु नये त्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात. जर तुम्ही असे केले तर तुमचे पचन बिघडू शकते. शरीरात टॉक्सिंस पदार्थ तयार होतात. केळी आणि छास दोन्हीचा गुणधर्म थंड पणा आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला येऊ शकतो.