CBSE ने जारी केल्या १० वी – १२ वीच्या अंदाजित तारखा, १७ फेब्रुवारीपासून सुरु होऊ शकतात परीक्षा
Tv9 Marathi September 25, 2025 02:45 AM

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने(CBSE) साल २०२६ च्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचा अंदाजित तारखा ( Tentative Datesheet ) जाहीर केल्या आहेत. अधिकृत सूचनेनुसार या परीक्षा १७ फेब्रुवारी ते १५ जुलै २०२६ दरम्यान देशभर आणि परदेशात घेतल्या जाऊ शकतात. बोर्डाने सांगितले की याचा उद्देश्य विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना वेळेत वेळापत्रक तयार करण्यास मदत करणे हा आहे. देश आणि विदशातून या परीक्षांना ४५ लाखाहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत.

परीक्षा वेळापत्रक आणि प्रकार

CBSE च्यावतीने जारी केलेल्या कार्यक्रमात इयत्ता १० आणि १२ वीच्या मुख्य परीक्षा, क्रीडा विद्यार्थी (Class 12) साठी विशेष परीक्षा, इयत्ता १० वीची द्वितीय बोर्ड परीक्षा आणि इयत्ता १२ वीची पूरक परीक्षा यांचा समावेश आहे. बोर्डाने हे स्पष्ट केले आहे की मुख्य परीक्षांसोबतच प्रायोगिक कार्य, मुल्यांकन, उत्तर पत्रिकांची तपासणी आणि निकालाची प्रक्रीयाही वेळेत पूर्ण केली जाईल म्हणजे विद्यार्थ्यांच्या निकाला उशीर लागणार नाही.

४५ लाख विद्यार्थी देणार परीक्षा

साल २०२६ मध्ये सुमारे ४५ लाख विद्यार्थी २०४ विषयाच्या परीक्षा देतील. या परीक्षांना भारतातील विविध राज्याच्या विद्यार्थी बसतील तसेच अन्य देशातील विद्यार्थी देखील परीक्षा देतील. सीबीएसईला मिळालेला जागतिक संपर्क आणि आंतरराष्ट्रीय मान्यता यातून दिसते. बोर्डाने असेही म्हटले आहे की या वेळापत्रकानुसार तयारी करण्यासाठी सर्व विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांमध्ये अधिक समन्वय आवश्यक आहे.

अंदाजित तारखा का जारी केल्या

सीबीएसई बोर्डाने आधी अंदाजित तारखांना जाहीर करण्याचा निर्णय विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुविधेसाठी घेतला आहे. हे अंदाजित वेळापत्रक २०२५ च्या इयत्ता ९ आणि ११ वीच्या रजिस्ट्रेशन डेटानुसार तयार केले आहे. बोर्डाने म्हटले आहे की यामुळे विद्यार्थ्यांना यामुळे तयारी करायला पुरेसा वेळ मिळेल आणि ते त्यांची तयारी व्यवस्थित करतील आणि अभ्यासाला देखील त्यांना नीट वेळ देता येईल.

या पावलाने अनेक फायदे होणार आहेत. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करण्याची संधी मिळेल. विषयानुसार नीट वेळ ठरवून अभ्यास करता येईल. शाळा देखील त्यांच्या अकादमीक आणि प्रशासकीय कार्य, उदा. परीक्षा संचालन आणि मुल्यांकनासाठी शिक्षकांची तैनाती योजना आधीच तयार करु शकतील. शिक्षकांना त्यांचे व्यक्तीगत कार्यक्रम आणि सुट्ट्याचे नियोजन करता येईल.

परीक्षेची अंतिम तारखा केव्हा जारी होणार ?

CBSE ने स्पष्ट केले आहे की अंतिम तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत. अंदाजित वेळापत्रकामुळे विद्यार्थी, शाळा आणि शिक्षकांना प्रारंभिक रुपरेषा समजण्यात मदत होत असते. बोर्डाने हे स्पष्ट केले की अंतिम निकाल वेळेवर लागण्यासाठी उत्तर पत्रिका तपासणी आणि इतर प्रक्रियाची योजनाबद्ध संचलन करण्यासाठी हे अंदाजित वेळापत्रक उपयोगी ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.