MPSC Exam Postponed: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एसपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, ही आहे नवीन तारीख
Tv9 Marathi September 27, 2025 03:45 AM

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 28 सप्टेंबरला होणार होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 आता पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता ही परीक्षा 9 नोव्हेंबरला आयोजित केली जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आयोगाकडून परिपत्रक जारी

मराराष्ट्र राज्यसेवा आयोगाने याबाबत एक पत्रक जारी केले आहे. यात आयोगाने म्हटले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 दिनांक 28 सप्टेंबर, 2025 रोजी राज्यातील 37 जिल्हाकेंद्रांवरील 524 उपकेंद्रांवर उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. तथापिः राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गांवाचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे.

राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने पत्र क्रमांक मलोआ-1125/प्र.क्र.236/मलोआ, दिनांक 26 सप्टेंबर, 2025 अन्वये केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ -दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. pic.twitter.com/1nF9x7ja7P

— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office)

सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 , दिनांक 28 सप्टेंबर,2025 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 9 नोव्हेंबर, 2025 रोजी घेण्यात येईल. उपरोक्त परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक 9 नोव्हेंबर, 2025 रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 चा सुधारित दिनांक शुद्धिपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ मिळणार

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण 385 पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील जवळपास 3 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी जीवतोड मेहनत घेतलेली आहे, अशातच आता या परीक्षेच्या तयारीसाठी आणखी एक ते दीड महिना मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.