Virat Kohli Property : टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्याआधी एक पाऊल उचललं. त्याने सगळेच हैराण झाले. त्याने गुरुग्रामच्या डीएलएफ सिटी फेज-1 मध्ये आपल्या आलिशान बंगल्याची जनरल पावर ऑफ अटॉर्नी (GPA) मोठा भाऊ विकास कोहलीकडे सोपवली. या दरम्यान अफवा पसरली की, विराटने हा बंगला आपल्या भावाच्या नावावर केला. विराटच्या मोठ्या भावाने या अफवांवर विराम लावत मोठं स्टेटमेंट केलं आहे.
गुरुग्राम स्थित या बंगल्यावरुन अफवा उडालेली असताना विकास कोहली इन्स्टाग्रामवर एक स्टोरी लावून मोठी गोष्ट बोलला आहे. “सध्या मी इतकऱ्या साऱ्या खोट्या सूचना आणि खोट्या बातम्या पसरल्यामुळे आश्चर्यचकीत नाहीय. काही लोक स्वतंत्र असून त्यांच्याकडे अशी कामं करण्यासाठी बराच वेळ आहे. तुम्हाला शुभेच्छा”
विकास कोहलीवर सोपवली जबाबदारी
विराट कोहलीने आपला 80 कोटीचा बंगला भावाच्या नावावर केला असं बोलणाऱ्यांना विकास कोहलीने पोस्टद्वारे उत्तर दिलं आहे. आता विकास कोहलीने आपला पक्ष ठेवला आहे. भारतीय टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या गुरुग्राम स्थित आलिशान बंगल्याची जबाबदारी मोठा भाऊ विकास कोहलीवर सोपवली आहे. त्यासाठी त्याने कायदेशीर कागदपत्र तयार केली. त्याला पावर ऑफ अटॉर्नी म्हटलं जातं.
विकास कोहलीने त्यांना सडेतोड उत्तर दिलं
विराट कोहली लंडनमध्ये पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसोबत राहतो. म्हणून तो वारंवार भारतात येऊन आपल्या प्रॉपर्टीचे मुद्दे पाहू शकत नाहीत. म्हणून त्याने पावर ऑफ अटॉर्नीच्या माध्यमातून भावाला अधिकार दिले आहेत, जेणेकरुन संपतीशी संबंधित विषय सहज मार्गी लागतील. काही लोकांनी या विषयाला दुसराच रंग दिला. त्यानंतर विकास कोहलीने त्यांना सडेतोड उत्तर दिलं.
एजेंटने घेतलेले निर्णय प्रिंसिपलना मान्य असतात
पावर ऑफ अटॉर्नी एक असा कायदेशीर दस्तावेज आहे, ज्यात एक व्यक्ती (ज्याला प्रिंसिपल बोलतात) तो कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला (त्याला एजेंट किंवा अटॉर्नी म्हटलं जातं) तो आपल्यावतीने खास काम करण्याची परवानगी देतो. हा अधिकार प्रॉपर्टीशी संबंधित असू शकतो. बँकिंग कार्य असू शकते किंवा कुठल्याही प्रकारच कायदेशीर कार्य. मालक म्हणजे प्रिंसिपल जेव्हा पावर ऑफ अटॉर्नी देतो, तेव्हा एजंटकडे त्या संपत्तींना सांभाळण्याचा पूर्ण अधिकार असतो. म्हणजे एजेंटने घेतलेले निर्णय प्रिंसिपलना मान्य असतात.