डॉ. मालविका तांबे
आधुनिक जीवनशैली ही सध्या संपूर्ण समाजामध्ये वेगवेगळ्या आजारांना वाव देत आहे. तरुण पिढी रोज नव्या नव्या समस्यांशी झुंज देत आहे. त्यांच्यामध्ये एक सगळ्यात कॉमन त्रास दिसतोय तो म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणे. हा कोलेस्ट्रॉल. खरंतर शरीराच्या चयापचय क्रियेतला एक खूप महत्त्वाचा भागीदार असतो. पण याची पातळी सामान्यापेक्षा जर का जास्त प्रमाणात वाढली तर ते शरीरात कुठेतरी चूक होती आहे याचं द्योतक असतं. पण सध्या चूक होतीये सांगणारा दूत आहे त्यालाच गोळी मारून संपवलं जातंय. कोलेस्ट्रॉल वाढला म्हणजे हृदयरोग होणारच अशा प्रकारचा समज समाजात सगळीकडे पसरलेला दिसतो. कोलेस्ट्रॉलची सामान्य पातळी २00 पर्यंत चालते, असं माहिती असतानासुद्धा २०० चे २०५ कोलेस्ट्रॉल झाला की लोकांची रात्रीची झोप नाहीशी होते आणि मग कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लोकांचा प्रयत्न सुरू होतो. त्याच्याकरिता गोळ्या घेणं, संपूर्णपणे तेल, तूप इत्यादीवर बंधन घालणे व ते कोलेस्ट्रॉल जितकं कमी असेल तितकं चांगलं अशा प्रकारची समजूतसुद्धा समाजामध्ये दिसते.
आयुर्वेदामध्ये दिनचर्येचे पालन व्यवस्थित न केल्यामुळे, किंवा चुकीचा आहार घेतल्यामुळे, अग्नीच्या दोषांमुळे बऱ्याचदा अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. हे अन्नाचं पचन व्यवस्थित न झाल्यामुळे शरीरात आम उत्पन्न होतो, असं सांगितलेलं आहे. अगदी सोप्या शब्दात समजाव्याचे झाले तर अन्न खाल्ल्यावर त्याचं पचन व्यवस्थित होऊन त्याचा काही भाग हा शक्तीत रुपांतरीत होतो व काही न पचलेला भाग हा मल स्वरूपामध्ये शरीरात फिरत राहतो आणि त्याला आम अशी संकल्पना दिलेली आहे. हा आमच कदाचित आजच्या काळातला कोलेस्ट्रॉल-ट्राइग्लिसराइड्स वगैरे असण्याची शक्यता दिसते. आयुर्वेदाप्रमाणे हा आम शरीरात निर्माण झाला की शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे रोग होताना दिसतात. तसेच याच्या मुळे अंगामध्ये जडत्व आल्यासारखं वाटतं. शरीरातलं सगळ चलनवलन बाधीत होतं. ताकद कमी होते, आळस वाढतो, उत्साह राहत नाही. मलप्रवृत्ती साफ होत नाही. अन्नात वासना रहात नाही. तोंड सतत कडू वाटतं. साधारणपणे अशीच लक्षणं आपल्याला कोलेस्ट्रॉल-ट्राइग्लिसराइड्स वाढलेल्या व्यक्तींमध्ये सुद्धा दिसत असतात. आम शरीरामध्ये उत्पन्न झाला की सर्वप्रथम काळजी घ्यावी लागते ती म्हणजे पचनाची. शरीरात अग्नी जर का व्यवस्थित कार्य करत असेल तर हे सगळे त्रास कमी व्हायला मदत मिळते. याच्या करता आपण आज काही उपाय बघूया.
सर्वप्रथम अग्निच्या संवर्धनााकरिता. सकाळी उठल्यावरती अनशा पोटी व तसेच आहार घेताना सुद्धा गरम किंवा कोमट पाणी पिणे जास्त उत्तम. फार शीत पेय घेणे, कार्बोदक पेय घेणे किंवा फार जास्त प्रमाणामध्ये बर्फ घालून पाणी किंवा ड्रिंक्स घेणे हे अग्नि करिता घातक ठरू शकते. शनिवारी रविवारी सुट्टी आहे म्हणून रात्रीचे जागरण करणं, धूम्रपान, मद्यपान करणं हेसुध्दा या अपंचनाला कारणीभूत ठरु शकतं. उलट त्याच्या जागी सुट्टीच्या रात्री १० ml कॅस्टर ऑईल हर्बल टी बरोबर घेतल्याने हे अपचन कमी व्हायला मदत मिळू शकते.
दुसरं आहाराची काळजी घेणं हे कोलेस्ट्रोल ला आटोक्यात ठेवण्याकरता अत्यंत महत्वाचे असते. जेवढी भूक असेल तेवढाच आहार घेणे, व सुपाच्य असलेले जेवण घेणे उत्तम. आंबवलेले, तळलेले, फार जास्त तिखट असलेले, चमचमीत असलेले अन्न खाणे किंवा पिझ्झा, बर्गर, नान, ब्रेड तसेच डीप फ्रोझन किंवा प्रिझर्व्हेटिव्ह घातलेले अन्न खाणे हे सगळे कोलेस्ट्रोल वाढायला कारणीभूत ठरू शकतात. शक्यतोवर या चुका करू नये. पण कधी काही कारणांमुळे हे अपरिहार्य असले तर पचनाच्या मदतीच्या दृष्टीने संतुलन अन्नयोग सारख्या गोळ्या जेवल्यानंतर घेणे, संतुलन पित्तशांती गोळ्या सकाळ-संध्याकाळ घेणे, तसेच रात्री झोपताना संतुलन सेनकुल चूर्ण घेणे हे आहाराच्या पचना करता मदत करू शकेल.
रात्रीचे जेवण शक्यतो उशिरा घेऊ नये. शक्य झाल्यास सात - सात साडे सात पर्यंत डिनर घेणे उत्तम असतं. आहारात काही गोष्टी आवर्जून ठेवाव्या जेणेकरून आपल्याला अन्न पचनावर व तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरता सुद्धा उपयोग होऊ शकेल.
मध - मध एकूणच आपल्या आरोग्याकरिता उत्तम असतं. मध हे उत्तम अँटी ऑक्सिडंट आहे. सकाळी उठल्यावर एक कप कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध व थोडेसे लिंबाचे रस घालून अनशा पोटी प्यायल्याने शरीरातले फॅट्स चे चयापचय व्यवस्थित व्हायला मदत मिळते.
लसूण - लसूण हा अग्नी वृद्धी करतो व तसंच त्याच्यामध्ये असलेलं सल्फर हा शरीरातल्या रक्त संवाहनाला मदत करतो व तसेच कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करायला मदत करतो असा अनेकांचा अनुभव आहे. चालत असल्यास सकाळी अनशा पोटी एक लसणाची पाकळी थोडंस सेंधव मीठ घालून बारीक करून खाल्लेली उत्तम असते. तसं करणं शक्य नसल्यास डाळीमध्ये, रसममध्ये भाज्यांमध्ये, सूप, पिझ्झा इत्यादींमध्ये लसणाचा वापर करता येऊ शकतो. घरी बनवलेली लसूण खोबर्याची चटणी सुद्धा अधून मधून खाल्ल्यास कोलेस्टेरॉलच्या पचन मधे मदत होऊ शकते.
Chh. Sambhajinagar Crime: नशेच्या बाजारात खोकला! परराज्यातून धुळ्यात अन् तेथून शहरात यायचे कफ सिरप; तब्बल १८ हजार ३६० बॉटल जप्तलसूण खाल्ल्यामुळे काही लोकांना शरीरात उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. अशा लोकांनी लसूण बरोबरच संतुलन च्या प्रवाळ पंचामृत मोती गोळ्या नियमित घेतलेलं जास्त बरं किंवा लसणाचा क्षीर पाक केला तर त्याच्याने सुद्धा लसणाची उष्णता कमी व्हायला मदत मिळते. आठवड्यातून एकदा दोनदा चारपाच लसणाच्या कळ्या घेऊन त्यांना वाटून घ्यावे व त्याचा कल्क साधारण २०० ml पाण्यामध्ये उकळत ठेवावा. त्याच्यामध्ये ५० ml दूध घालावं. सतत ढवळत राहावं. संपूर्ण पाणी वाष्पीकृत झाल्यानंतर त्याला गाळून घ्यावं. याच्यामध्ये चवीपुरती साखर घालून सेवन करावं.
मेथी - मेथीच्या बिया किंचित उष्ण असतात. शरीरामध्ये अग्नि संवर्धकरता मदत करतात व त्याच बरोबरीने कोलेस्ट्रॉल च्या पचन करता सुद्धा मदत करतात. रात्री पाव चमचा मेथीच्या बिया अर्ध्या वाटी पाण्यात भिजवाव्या. दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून ते पाणी पिऊन टाकावं. भिजलेल्या मेथीच्या बियांना मोड यायला ठेवावे व मोड आल्यानंतर त्यांना भाजी किंवा आमटी च्या फोडणीत वापरलेले उत्तम. किंवा मेथीच्या बियांची वाटून पेस्ट करावी आणि ती भाजी किंवा आमटी करता करणाऱ्या मसाल्यांमध्ये वापरलेली चांगली. तसेच आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरल्या जाणाऱ्या मसाल्यां पैकी हळद, धणे, आलं, दालचिनी, हिंग याचाही वापर केल्यास पचन सुधारायला मदत मिळते.
फ्लॅक्स सीड्स - सध्याच्या काळात फ्लॅक्स सीड्स अर्थात जवसाच्या बिया या खूप प्रसिद्ध झालेल्या आहेत. आपल्या पारंपरिक जेवणामध्ये जवसाची चटणी ही नियमित खाण्याचा प्रघात आपल्याकडे पूर्वापार आहे. जवसाची चटणी करून खाल्ली तर उत्तमच. किंवा भाजलेले जवसाच्या बिया या नुसत्या चावून चावून खाल्ल्यास तरीही चालू शकतं किंवा त्याची पूड करून ठेवल्यास त्याचाही वापर आपल्या भाजी आणि आमटी मध्ये करता येऊ शकतो.
कोलेस्ट्रॉल-ट्राइग्लिसराइड्स वाढले की सगळ्यात पहिले बंद केलं जातं ते म्हणजे तूप आणि तेल. पण आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं साजूक तूप, मंजे दूध व्यवस्थित तापवून त्याची साय काढून विरजण लावून दही घुसळून लोणयापासून जे तूप बनवलं जातं. याची संपूर्ण माहिती मिळण्याकरिता डॉक्टर मालविका तांबे या युट्युब चैनल वर तुपाचा वीडियो नक्की बघावा. पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या तुपाने, कोलेस्ट्रोल व ट्राइग्लिसराइड्स वाढत नाहीत. याच तुपा पासून आयुर्वेदिक रित्या संस्कारित तूप बनवून कार्ला येथील आत्म संतुलन व्हिलेज मध्ये आपण जेव्हा शास्त्रोक्त पंचकर्म करतो तेव्हा स्नेहनाच्या वेळेस कप कपभर तूप घेऊन सुद्धा कोणाच्या ही ट्राइग्लिसराइड्स किंवा कॉलेस्ट्रॉल वाढताना दिसत नाहीत. उलट ज्या लोकांचे वाढलेले ट्राइग्लिसराइड्स किंवा कोलेस्ट्रॉल असतील त्याची पातळी रक्तामध्ये कमी झालेली नंतर आढळते. अमेरिकेत बरेचशे पेशंट्स खूपच जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल आणि ट्राइग्लिसराइड्स वाढल्यानंतर जेव्हा पंचकर्माला येतात तेव्हा तूप पाजलं जाईल या कल्पनेने ते थोडे घाबरलेले असतात. पंचकर्म नंतरचे रिपोर्टस बघून मात्र त्यांना आश्चर्यचकित व्हायला होतं.
दिनचर्येमध्ये आहाराबरोबरच व्यायामाला ही तेवढेच महत्व दिलं गेलेलं आहे. शरीरातली अग्नी जर व्यवस्थित कार्य करावी अशी इच्छा असली तर व्यायामाला पर्याय नाही. रोज न चुकता कमीत कमी पस्तीस मिनिटं चालणे तसेच चार ते पाच सूर्यनमस्कार घालणे व जमेल तेवढे योगासन करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. सकाळच्या वेळेला साधारण दहा मिनिट प्राणायाम, दीर्घ श्वसन, भस्त्रिका, संतुलन क्रियायोग हेही करणं उत्तम ठरेल. एकूणच फक्त गोळ्या घेऊन कोलेस्ट्रॉल किंवा ट्राइग्लिसराइड्स वर नियंत्रण ठेवण्यापेक्षा स्वतःची जीवनशैली जर का सुधारली तर कोलेस्ट्रॉल, ट्राइग्लिसराइड्सज नव्हे, सगळ्याच प्रकारचे रोग कमी व्हायला मदत मिळू शकेल.