आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्राटचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
गौरी स्प्राट पापाराझींवर भडकली आहे.
गौरीच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. तो सध्या गर्लफ्रेंड गौरी स्प्राट (Gauri Spratt) सोबत राहत आहे. आमिर आणि गौरी अनेक वेळा एकत्र स्पॉट होतात. मात्र सध्या गौरी स्प्राटचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये गौरी चिडलेली पाहायला मिळत आहे.
गौरीला नुकतेच मुंबईतस्पॉट करण्यात आले. तिचे फोटो काढण्यासाठी पापाराझी तिच्या मागे फिरताना दिसले. ज्यामुळे गौरी खूपच वैतागली. पापाराझी आपले फोटो काढत आहे आणि आपला पाठलाग करत आहे हे पाहून गौरी अस्वस्थ आणि नाराजझाली. गौरी म्हणते की, "तुम्ही लोक कुठून आलात? तुम्ही माझा पाठलाग का करत आहात? मला एकटे सोडा..." अशा शब्दात तिने पापाराझींना चांगले सुनावले.
गौरीस्प्राटचा हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. तसेच नेटकरी या व्हिडीओवर खूप कमेंट्स करत आहे. या व्हिडीओवर समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक पापाराझींना नावे ठेवत आहे. तर काही लोक तिच्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत. गौरी स्प्राटचा हा व्हायरल व्हिडीओ मुंबई वांद्रे येथील आहे.
View this post on InstagramA post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)
आमिर खान अलिकडेच आर्यन खानचा 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड'मध्ये पाहायला मिळाला. त्याआधी तो 'सितारे जमीन पर' आणि 'कुली' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. आमिर खान बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो.आमिर खान आज 60 व्या वाढदिवशी रिलेशनशिपची कबुली दिली. गौरी आमिर खानच्या प्रोडक्शन बॅनरखाली काम करते.'लाहौर 1947' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्या सोबत सनी देओल झळकला आहे. चाहते आमिरच्या आगामी चित्रपटांसाठी खूप उत्सुक आहेत.
सलमान खानच्या 'Bigg Boss 19'मध्ये दिसणार 'नागिन'ची पहिली झलक, 'ही' अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका