थेरगाव-गणेशनगर प्रभाग क्रमांक २४
esakal November 01, 2025 05:45 PM

प्रभाग २४ ः थेरगाव-गणेशनगर

पायाभूत सुविधांवर
मतदारांचा कल
- बेलाजी पात्रे

प्र भाग २४ मध्ये व्यक्ती केंद्रित मतदानाची परंपरा असली तरी आयटीचा नवीन मतदार यंदा निर्णायक ठरणार आहे. वाढत्या नागरीकरणाने गृहनिर्माण सोसायट्या, आयटीसंबंधित उद्योग, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक क्षेत्रांतील मतदारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. या नव्या मतदारांचा कल विकास आणि पायाभूत सुविधांवर केंद्रित असण्याची शक्यता आहे. हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला असताना गतवेळी पक्षाला निम्म्या विजयावर समाधान मानावे लागले.

पक्षीय स्थिती
- शिवसेनेसह भारतीय जनता पक्षाची मजबूत पकड, राष्ट्रवादी काँग्रेसचे कडवे आव्हान
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कुठल्याही हालचाली नाहीत
- शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सामना होण्याची शक्यता
- काँग्रेस, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्षांनी अद्याप वेग घेतला नाही

समाविष्ट भाग
अदित्य बिर्ला हॉस्पिटल, दत्तनगर, पद्मजी पेपरमिल, ग्रिन्स हाउसिंग सोसायटी, गंगा ओशियन मिडोज, पडवळनगर भाग, गणेशनगर, प्रथम सोसायटी, क्रांतीनगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी, गुजरनगर, मंगलनगर, बेलठिकानगर इत्यादी.

दृष्टीक्षेपात...
- सोसायट्या, व्यावसायिक भागांतून सुमारे वीस हजार नवे मतदार
- पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, स्थानिक विकासाला प्राधान्य
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षापुढे उमेदवार शोधण्याचे आव्हान
- नवमतदारांच्या हाती प्रभागाचा निकाल राहण्याची शक्यता

प्रचारातील संभाव्य मुद्दे
- पाणीपुरवठ्यासह स्थानिक समस्या
- वाहतूक कोंडी, रस्ते विकास
- प्रलंबित विकासकामे
- आरक्षणांचा विकास

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.