खराडी : ‘रक्षक नगर गोल्ड’कडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेज तुंबून सर्व दूषित पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याने रस्त्याच्या बाजूला खोलगट भागात साचून राहत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हीच स्थिती असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. महापालिका प्रशासनाला याबाबत कळवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात होत असल्याचे स्थानिक रहिवासी सुशीला सोनवणे, गोविंदराम चौधरी यांचे म्हणणे आहे.
Wardha Crime: नातीने केली आजीच्या घरी चोरी; चोरीच्या मुद्देमालातून खरेदी केली कार, दुचाकी, आयफोनया भागातील गटारींचीही नियमित सफाई होत नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ड्रेनेजमध्ये कचरा व प्लॅस्टिक अडकून ते तुंबले आहेत. त्यामुळे सांडपाणी व मैलापाणी रस्त्यावरून लांबपर्यंत वाहत जाऊन खोलगट भागात साचते. ड्रेनेज तुंबण्याची समस्या अनेक दिवसांपासून आहे. सांडपाणी रस्त्यावर आल्याने परिसरातील नागरिकांना व वाहतुकीला अडचण होत आहे.
याशिवाय, आरोग्याची समस्या गंभीर होत आहे. याशिवाय, दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत नगररोड क्षेत्रीय कार्यालयाचे ड्रेनेज विभागाचे अभियंता हेमंत देसाई म्हणाले, ‘स्वच्छता कर्मचारी यांना पाठवून दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचना देण्यात येतील.