धावडेवस्ती-सद्गुरुनगर (प्रभाग क्र.६)
esakal November 01, 2025 06:45 PM

प्रभाग ६ ः धावडेवस्ती, सद्गुरुनगर

कामगार वर्गाचे
पाठबळ महत्त्वाचे
- संजय बेंडे

धा वडेवस्ती- सद्गुरुनगर प्रभागाचा सुमारे ७० टक्के भाग रेडझोनने व्यापलेला आहे. कामगारांची संख्या पन्नास टक्के आहे. राज्यातील विविध भागांसह उत्तरप्रदेश, बिहारमधील नागरिकांची संख्या अधिक, त्यांची मते निर्णायक ठरणार आहेत. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने चारही जागा जिंकल्या होत्या. कामगारांचा प्रभाव निवडणुकीत दिसणार आहे. गेल्या निवडणुकीत बिनविरोध आलेल्या भाजप नगरसेवकाने वेगळी वाट धरली आहे. मोठी राजकीय खेळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चाळीतील कामगारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कामगारांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागेही कामगार उभे राहण्याची शक्यता आहे.

समाविष्ट भाग
धावडेवस्ती, भगतवस्ती, गुळवेवस्ती, चक्रपाणी वसाहत भाग, पांडवनगर, रोशल गार्डन परिसर, सदगुरूनगर

पक्षीय स्थिती
- बालेकिल्ला राखण्यासाठी भाजपला बंडखोरी टाळणे गरजेचे
- गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही चांगली कामगिरी
- प्रभावशील उमेदवार देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न राहील
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारंपरिक मतदार

दृष्टिक्षेपात
- उत्तरप्रदेश, बिहारमधील मतदारांचा प्रभाव राहणार
- भाजपची पारंपरिक मतपेढी
- पक्षात बंडखोरी झाल्यास भाजपला फटका बसणार
- विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस रणनीती आखणार

प्रचारातील संभाव्य मुद्दे
- विविध समस्या सोडविणे, सुविधा देणे
- रेडझोन प्रश्न, विकासकामे मार्गी लावणे
- अनधिकृत बांधकामांना आळा घालणे
- वीज, पाण्याचा सुलभ पुरवठा करणे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.