Marathi Entertainment News : अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिच्या झी मराठीवरील वीण दोघातली ही तुटेना या मालिकेमुळे चर्चेत आहे. ही मालिका सध्या त्याच्या चांगल्या टीआरपीमुळे गाजतेय. काल तेजश्री प्रधान लग्नाच्या ट्रॅकनंतर मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण नुकतंच तेजश्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर खुलासा केला. काय म्हणाली तेजश्री जाणून घेऊया.
तेजश्रीने काल तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तिने तिच्या आगामी वेबसीरिजचे बिहाइंड द सीन शेअर केले होते. त्यावरून तेजश्री आता मालिका सोडणार असल्याच्या चर्चाना ऊत आला होता.यावर तिने पोस्ट करत माध्यमांना खडेबोल सुनावले.
तेजश्रीची पोस्टआज तेजश्रीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करते. त्यात ती म्हणते,"प्रिय मीडिया रिपोर्टर्स, वीण दोघांतली ही तुटेना ही माझी मालिका सोडण्याचा माझा कुठलाही विचार नाहीये. तरीही आपल्या half knowledge नी views साठी बातम्या छापून आणू नयेत.. ही झी मराठीशी असलेली वीण तुटणे नाही. लोभ असावा."
तेजश्रीच्या या पोस्टमुळे ती मालिका सोडण्याच्या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे. पण तेजश्री कोणत्या वेबसिरीजमध्ये दिसणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. लवकरच या विषयीचे अपडेट्स समजतील.
दरम्यान तेजश्रीने प्रेमाची गोष्ट ही स्टार प्रवाहची मालिका अर्ध्यावर सोडली होती. याचं कारण मात्र तिने स्पष्टपणे उघड केलं नाही. पण कथानकातील बदल यावरून मतभेद असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.
लग्नाच्या शुटिंगनंतर 'वीण ही दोघांतली तुटेना' मालिका सोडणार तेजश्री प्रधान? व्हिडिओ शेअर करत दिली अपडेट