प्राची गावसकर
Successful business : हळदीच्या कार्यकमात नववधूने खऱ्या ताज्या फुलांचे घातलेले अतिशय सुंदर दागिने बघून मी अक्षरशः थक्क झाले. खऱ्या फुलांचे इतके नजाकतीने केलेले दागिने म्हणजे घडविणाऱ्या कलाकाराच्या कौशल्याची दाद द्यावी तितकी कमीच वाटत होती.
हे दागिने वीणा तन्ना यांनी आपल्या हाताने साकारल्याचे कळल्यानंतर मी त्यांच्याशी संपर्क साधला. या कलेप्रती असणारी आवड, व्यवसायातील निष्ठा या बळावर त्यांनी आतापर्यंतच्या आयुष्यात दोन वेळा उद्भवलेला कर्करोग, स्लीपडिस्क आदी विविध गंभीर आजारांवर मात करत त्यांनी आपली कला, सर्जनशीलता जपली आहे. फुलांचे दागिने घडविण्यातील आणि त्याने सौंदर्य खुलविण्यातील आनंद त्यांची ऊर्जा आहे.
वीणा आज एक उत्तम व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट, हेअरस्टायलिस्ट आणि फुलांच्या दागिन्यांच्या डिझायनर म्हणून ओळखल्या जातात. गेली जवळपास ३५ वर्षे त्या पुण्यात सौंदर्य क्षेत्रात काम करत आहेत. गेल्या काही काळापासून त्यांनी नववधूचा मेकअप आणि फुलांचे दागिने यांच्या ऑर्डर घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
फुलांच्या दागिन्यांच्या एका दिवसासाठी फक्त दोन ऑर्डर घेतात. कारण हे काम त्या स्वतः एकट्याच करतात. यासाठी कोणीही मदतनीस घेत नाहीत. वधूची किंवा ज्या मुलीसाठी दागिने घडवायचे असतील, तिची आवड निवड, साडी, पोषाखाचा रंग अशा अनेक बाबींचा बारकाईने विचार करून फुले निवडून, आकर्षक रंगसंगती, डिझाइन ठरवून त्यानुसार दागिना घडवतात. या कामाला वैयक्तिक स्पर्श झाला पाहिजे असे त्यांचे मानणे आहे, त्यामुळे त्या स्वतःच हे काम करतात.
प्रत्येक ग्राहकाला आत्मविश्वास, अभिजात आणि नैसर्गिकरीत्या सुंदर वाटावे, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. दागिने तयार केल्यावर त्याचे उत्तम पॅकिंग करणे, ते व्यवस्थित पोहोचतील यासाठी जागरूक असतात. त्यामुळे त्यांच्याकडे सतत ऑर्डर येत असतात आणि त्या उत्साहाने पूर्ण करत असतात.
लहानपणापासून त्यांना कलात्मक गोष्टी करण्याची आवड होती, यातूनच त्यांनी लग्नानंतर पती राजू तन्ना यांच्या प्रोत्साहनामुळे पुण्यात १९९३ मध्ये ‘सौंदर्य ब्युटी क्लिनिक आणि प्रशिक्षण’ केंद्र सुरू केले. नववधूंचा मेकअप, केशरचना ही त्यांची खासियत होती. हेअस्टायलिंग करतना त्या फुलांचा आकर्षक रीतीने वापर करत.
यातूनच त्यांनी नैसर्गिक फुलांचे दागिने करण्यास सुरुवात केली. तेव्हा पुण्यात तगरीच्या कळ्या मिळत नसत, तेव्हा त्यांचा भाऊ दादरच्या फुलबाजारातून तगरीच्या पांढऱ्या शुभ्र कळ्या आणि इतर सुंदर फुले पाठवून देत असे. त्यातून त्या हार, कर्णफुले, अंगठी असे विविध दागिने तयार करत. नातेवाईक, मित्र परिवारातील मुलींच्या विवाहात त्यांनी हे दागिने देण्यास सुरुवात केली.
नैसर्गिक फुलांचे सौंदर्य, त्यांची केलेली आकर्षक बांधणी सर्वांना मोहून टाकू लागली आणि वीणा यांच्यावर ऑर्डरचा वर्षाव होऊ लागला. ‘वीणा तन्ना मेकअप आर्टिस्ट’ आणि ‘फ्लोरल आर्ट बाय वीणा तन्ना’ हे ब्रँड नावारूपाला आले. अलीकडच्या काळात फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावरही त्यांनी हजेरी लावली आहे.
SBI Job Vacancy 2025: SBI जॉब अलर्ट! स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू, पॅकेज तब्बल 1.35 कोटीत्यामुळे त्यांचे काम अनेकांपर्यंत पोहोचले आहे. या सर्व प्लॅटफॉर्मची ओळख आणि वापरण्याचे तंत्र त्यांना त्यांच्या वकील असलेल्या सुनेने अवधी यांनी शिकवले आहे. ती त्यांची पहिली मॉडेलही असते. त्यांनी बनवलेले फुलांचे दागिने सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी ती अतिशय उत्साहाने त्यांना मदत करते.
उच्च न्यायालयात वकील असलेला त्यांचा मुलगा महेक हादेखील त्यांना कामात लागेल ती सर्व मदत करतो. सर्वांच्या पाठबळावर आणि सुंदर फुलांच्या दागिन्यांनी सजलेल्या मुलींच्या हास्याने त्यांनी आपली ही कला जपली आहे. ही कला जिवंत राहावी यासाठी ती नव्या मुलींना देण्यासाठी कार्यशाळा, क्लासेस घेण्याचा त्यांचा मानस आहे.
Career Tips : यशस्वी व्हायचंय? जबाबदारी घ्या! करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी 5 महत्त्वाचे कानमंत्र