OBC आरक्षणासाठी तरूणानं आयुष्याचा दोर कापला; कुटुंबियांचा आक्रोश, मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवला
Saam TV November 02, 2025 01:45 AM

संदीप नागरे, साम टिव्ही

ओबीसी आरक्षणासाठी हिंगोलीत तरूणानं आयुष्य संपवलं आहे. त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. माहितीनुसार, तरूणानं बारावीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. तो नोकरीच्या शोधात होता. तरूण ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात सक्रीय सहभागी होता, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. दरम्यान, तरूणाला न्याय मिळावा, या मागणीसाठी कुटुंबियांसह गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह मृतदेह कळमनुरी तहसील कार्यालयाच्या परिसरात आणून ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे.

संतोष शिवाजी कागणे (वय वर्ष २७) असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. तरूण हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा गावातील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, तरूणाचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. तो नोकरीच्या शोधात होता, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. तसेच संतोष शिवाजी कागणे ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनातही सहभाग घ्यायचा, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.

कोल्हापूरात काँग्रेसला जबरी धक्का; भाजपनं बडा नेता फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, त्यानं ओबीसी आरक्षणासाठी आयुष्य संपवलं आहे. गळफास घेऊन तरूणानं आत्महत्या केली. संतोष या तरूणाला न्याय देण्यासाठी कुटुंबासह गावातील नागरीक एकवटले आहेत. कुटुंबियांनी संतोषच्या मृतदेहाला अग्नी दिली नाही. त्यांनी मृतदेह कळमनुरी तहसील कार्यालयाच्या परिसरात आणून ठेवला आहे.

'सुनेच्या पगारातून सासऱ्याला २० हजार रूपये मिळतील'; उच्च न्यायालयाचा निकाल, नेमकं प्रकरण काय?

'ओबीसी आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारने उत्तर द्यावं, तेव्हाच मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी घेऊन जाऊ'; अशी मागणी कागणे कुटुंबियांनी व्यक्त केली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.