सिंधी कॅम्प येथील कार्डियाक केअर हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा सुरू असताना एका डॉक्टरवर तिघा आरोपींनी मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना आज दुपारी घडली. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी डॉ. दीपक रामचंद्र नेनवाणी (वय ३८) हे कार्डियोलॉजिस्ट असून ‘लीलाई अपार्टमेंट, आदर्श कॉलनी’ येथे राहतात.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश गणेश नद्रे (४०), शुभम प्रवीणसिंग ठाकूर (३०) व शेख शकील शेख खालील (२६) (सर्व रा. सिंधी कॅम्प, अकोला) हे दुपारी सुमारे १२.२५ वाजता एका महिलेसह हॉस्पिटलमध्ये आले. महिलेला छातीत दुखत असल्याचे सांगितल्यानंतर स्टाफने बीपी तपासणी करण्याची सूचना केली. त्यावरून आरोपींनी स्टाफशी वाद घालून शिवीगाळ केली.
Akola News: तेल्हारा येथील मेंढपाळाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यूघटनेची माहिती मिळताच डॉ. नेनवाणी हॉस्पिटलमध्ये आले असता, आरोपी आयसीयूमध्ये बसलेले होते. डॉक्टरांनी रुग्णालयातील नियमांनुसार “आयसीयूमध्ये फक्त रुग्ण राहू द्या, आपण बाहेर थांबा,” असे सांगितले असता आरोपींनी अचानक संतापून डॉक्टरांची कॉलर पकडली, त्यांना बाहेर ओढत आणले आणि अश्लील शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात डॉ. नेनवाणी यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाला.
Akola News : तरुणीने घरात गळफास घेऊन संपविले जीवनघटनेची नोंद खदान पोलीस ठाण्यात अप. क्र. ८९८/२०२५ अंतर्गत कलम 117(2), 115(2), 333, 296, 3(5) बीएनएस (जुनी कलमे 325, 323, 452, 294, 34 IPC) प्रमाणे करण्यात आली आहे. आरोपींना आज सायंकाळी ४.०५ वाजता अटक करण्यात आली असून पुढील तपास खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.