MP Dhananjay Mahadik : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणारच; आगे आगे देखो होता है क्या?
esakal November 02, 2025 06:45 AM

मोहोळ - भविष्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा व भीमा परिवार मिळवून लढविणार आहे. यापूर्वी साथ दिलेल्यानांही सोबत घेणार असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकी बाबत आपली भूमिका खासदार महाडिक स्पष्ट करीत होते. अद्याप कोणत्याही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही, त्यामुळे नेमका काय निर्णय घ्यायचा हे अद्याप ठरले नाही. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच त्या प्रक्रियेला वेग येणार आहे.

मात्र कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी निवडणुका लढविणारच असा ठाम निर्धार खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, गेल्या वेळेची परिस्थिती वेगळी होती यावेळी वेगळी आहे. आघाड्या व समविचारी आघाड्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान माजी आमदार राजन पाटील हे भाजपात आले आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकी संदर्भात महाडिक यांना विचारले असता विचाराने काय तोडगा निघाला तर विचार करू, अन्यथा आम्ही निवडणुका लढवणार आहोतच. भाजपात राजन पाटील यांचे स्वागत आहे. वरिष्ठांनी त्यांना प्रवेश देताना विचार करूनच दिला आहे. या निवडणुका पक्ष चिन्हा वरच व्हाव्यात असा माझा प्रयत्न असल्याचे सांगत, "आगे आगे देखो होता है क्या" अशी टिप्पणी खा महाडिक यांनी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.