किवळे, ता. १ : किवळे येथील मुकाई चौकात शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पीएमपीएलच्या चार बस, खासगी ट्रॅव्हल्स, चारचाकी वाहने आणि दुचाकीस्वार अर्धा ते पाऊण तास या कोंडीत अडकले होते.
मुकाई चौकात वाहतूक कोंडी ही नित्याची समस्या बनली आहे. बस टर्मिनलच्या आसपास उभ्या असणाऱ्या बस, अरुंद रस्ता आणि शुक्रवार-शनिवार या दिवशी नोकरदार सुटण्याच्या वेळेतील वाढती गर्दी या कारणांमुळे कोंडी वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे बस टर्मिनल इतर ठिकाणी हलविण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
परिसरातील वाढत्या गृहसंकुलाच्या संख्येनुसार पायाभूत सुविधा वाढविण्याची गरज आहे.
-विशाल गजरमल, पोलिस निरीक्षक, देहूरोड वाहतूक विभाग
वाहतूक पोलिसांच्या पातळीवर वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
-प्रमिला क्षीरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक