पिंपरी चिंचवड शहर पोलिस भरती
३२२ पदांसाठी पोलिस भरती
अर्ज करण्याची शेवटची तारीख
पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड शहरात पोलिस भरती जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ३२२ पदांसाठी पोलिस भरती करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या विभागात ही भरती केली जाणार आहे. या भरती मोहिमेत तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२५ आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
Governemnt Job: बेरोजगारांना मोठा दिलासा! १० हजार ३०९ जणांना शासकीय नोकरी | VIDEOपिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या माहितीनुसार, या भरती मोहिमेत ३२२ पैकी ९७ जागा सर्वसाधारण उमेदवारांसाठी आहेत. महिलांसाठी ९७ पदे, खेळाडूंसाठी १६ पदे, प्रकल्पग्रस्त व्यक्तींसाठी १६ पदे, भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी सहा, माजी सैनिकांसाठी ४६, अर्धवेळ पदवीधरांसाठी १६ तर पोलिस कॅडेट्ससाठी १० आणि होमगार्ड पदासाठी १६ जागा रिक्त आहेत. याबाबत पुणेकर न्यूजने वृत्त दिले आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस भरतीसाठी तुम्हाला https://policerecruitment2025.mahait.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या पदासाठी लेखी परीक्षा महाराष्ट्रातील सर्व युनिट्समध्ये एकाच दिवशी घेतली जाईल. प्रत्येक उमेदवार संपूर्ण राज्यातील फक्त एकाच युनिटसाठी अर्ज करु शकता.
Government Job: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी कंपनीत नोकरी; ११८० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?निवडप्रक्रिया
पोलिस भरतीची लेखी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी होणार आहे. यानंतर शारीरिक चाचणी होणार आहे. यानंतर शॉर्टलिस्टिंग केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल.शारिरिक चाचणीत किमान ५० टक्के गुण आणि लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण आवश्यक आहे.
शारीरिक आणि लेखी परीक्षेच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
Thane Traffic Police : नंबर प्लेट गंजलेली, हेल्मेट नाही; ठाण्याच्या तरूणाने वाहतूक पोलिसाला विचारला जाब, व्हिडिओ व्हायरल