पेठा आणि उच्चशिक्षित वर्गाचा अंतर्भाव
esakal November 02, 2025 11:45 AM

प्रभाग १८ : चिंचवडगाव

पेठा आणि उच्चशिक्षित वर्गाचा अंतर्भाव
- बेलाजी पात्रे

पिंपरी चिंचवड शहरातील मध्यवर्ती आणि महत्त्वाचा भाग असलेल्या चिंचवडगाव परिसरात पूर्वापार गावकी, भावकीचे राजकारण चालत आले आहे. पूर्वीपासून काही स्थानिक कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. प्रभाग १८ मध्ये पेठा आणि उच्चशिक्षित वर्गाचा अंतर्भाव आहे. गेल्या काही वर्षांत आयटीयन्स आणि उच्चशिक्षित वर्गाची वाढलेली संख्या तसेच हिंदुत्ववादी पारंपारिक मतदारांचा वरचष्मा राहिला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील सर्व घटक पक्ष स्वतंत्र लढल्यास सर्व उमेदवारांना लढायची संधी मिळणार असून धक्कादायक निकाल हाती लागू शकतात. गेल्या काही वर्षांत सुमारे वीस ते पंचवीस हजार नवीन मतदार वाढले आहेत.

पक्षीय स्थिती
- भाजपचे अधिक प्राबल्य
- राष्ट्रवादी काँग्रेसलाही पसंती
- दोन्ही शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कुठलीही हालचाल नसल्याचे चित्र

समाविष्ट भाग
एसकेएफ कॉलनी, रस्टन कॉलनी, पवनानगर, वेताळनगर, चिंचवड गावठाण, केशवनगर, तानाजीनगर, काकडे पार्क, मोरया राज पार्क, दर्शन हॉल, माणिक कॉलनी, लक्ष्मीनगर, यशोपूरम सोसायटी इत्यादी

दृष्टिक्षेपात
- पारंपारिक भाजप अनुकूल सुशिक्षित मतदारांची सर्वाधिक संख्या
- विकासकामे, व्हिजन आणि जनसंपर्क पाहून मतदार कौल देणार
- उच्चशिक्षित, पारंपारिक हिंदुत्ववादी मतदार ठरवणार निकाल
- महायुती, महाविकास आघाडी होऊन लढल्यास बंडखोरीची सर्वाधिक शक्यता

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.