आज पाहायला गेलं तर फक्त मोठ्या माणसांना नाहीत तर, लहान मुलांना देखील चष्मा आहे… सतत मोबाईल पाहणं, 8 – 9 तास लॅपटॉवर काम करणं… हे चष्मा लागण्याचं सर्वात मोठं काम आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत, सतत स्क्रीनवर बसणे, झोपेची कमतरता आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यांचा आपल्या दृष्टीवर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत, लहान वयातही चष्मा घालणे सामान्य झाले आहे.
जर तुम्हालाही तुमचे डोळे निरोगी आणि चष्म्यापासून दूर राहायचं असेल तर, काही नौसर्गिक उपाय नक्की करा.. तुम्हा सकाळी रिकाम्या पोटी नैसर्गिक पदार्थ खाण्यास सुरुवात केली तर. चष्मा कायमचा दूर होऊ शकते. असे काही पदार्थ आहेत ज्यांमुळे डोळ्यांच्या स्नायूंना बळकटी देतात, दृष्टी वाढवतात आणि वयानुसार दृष्टी कमी होण्यापासून रोखतात. तर ते पदार्थ कोणते आहेत जाणून घ्या…
एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. मेथीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात. दुसरं म्हणजे, ते डोळ्यांचा थकवा, सूज आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम खाणं देखील डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. बदामामध्ये असलेले व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड दृष्टी आणि मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम आहेत. ते डोळ्यांच्या कोरडेपणा आणि वयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करतात.
बीट हे लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन ए चा एक उत्तम स्रोत आहे. सकाळी रायत्यामध्ये बीटचा रस किंवा बीट खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे डोळ्यांना ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा होण्यास मदत होते. यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होतो.
आयुर्वेदात दृष्टी सुधारण्यासाठी आवळा हा एक सुपरफूड मानला जातो. आवळा व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए ने समृद्ध असतो, जो डोळ्यांच्या पेशींना पोषण देतो आणि मोतीबिंदूसारख्या समस्या टाळतो. सकाळी आवळ्याचा रस किंवा आवळ्याचा मुरंबा खाल्ल्याने डोळे दीर्घकाळ निरोगी राहतात.
तुळशीची पाने डोळ्यांची जळजळ, लालसरपणा आणि संसर्गापासून आराम देतात. सकाळी रिकाम्या पोटी 3 – 4 तुळशीची पाने चावल्याने डोळ्यांची सूज आणि थकवा कमी होतो. तुळशीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात.
जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते, जे डोळ्यांना कोरडेपणा येण्यापासून वाचवतं. दररोज सकाळी एक चमचा जवस किंवा त्यांची पावडर पाण्यासोबत घेतल्याने डोळ्यांचं आरोग्य सुधारतं.
गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन असतं, जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होतं. व्हिटॅमिन ए हे रेटिनासाठी आवश्यक आहे आणि दृष्टी मजबूत करते. गाजराचा रस पिणं किंवा गाजर खाणं हे दृष्टी सुधारण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
याव्यतिरिक्त, दररोज 7 – 8 तास झोप घ्या. दर 20 मिनिटांनी स्क्रीनवरून दूर पहा… डोळे थंड ठेवण्यासाठी काकडीचा वापर करा. कोरडेपणा टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.