धाराशिव जिल्ह्यात भरदिवसा रिक्षा चालकाची कुऱ्हाडीने हत्या
जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यामुळे गावात तणावाचे वातावरण
आरोपी निखिल कांबळे तासाभरात पोलिसांच्या ताब्यात
मृत गुरुसिद्धाप्पा दहिटणे यांच्या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण
धाराशिव जिल्ह्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या रागातून भर दिवसा रिक्षा चालकाची कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली आहे. या घटनेनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. मृत रिक्षा चालकाचं नाव गुरुसिद्धाप्पा दहिटणे असे आहे. तर, निखिल कांबळे असे या हल्लेखोरांच नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे भर दिवसा गुरुसिद्धाप्पा दहिटणे आणि निखिल कांबळे यांच्यात जुन्या वादाने पुन्हा तोंड वर काढले. या दोघांमध्ये भर दिवसा जोरदार भांडण झालं. हे भांडण एवढ्या टोकाला गेलं की निखिल कांबळेने दहिटणे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात दहिटणे यांचा जागीच मृत्यू झाला.
Rain Alert : पावसाचा मुक्काम आणखी वाढला,नोव्हेंबर महिन्यातही धो धो कोसळणार, वाचा हवामान खात्याचा अंदाजया घटनेनंतर हल्लेखोर निखिलने घटनास्थळावरुन पळण्याचा डाव रचला, मात्र त्याचा डाव अवघ्या तासाभरात उध्वस्त झाला. मूळचा पुण्याचा असणारा निखिल त्याच्या मूळगावी म्हणजेच पुण्याला जाण्यासाठी निघाला. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून तो पुण्याकडे रवाना झाला. नळदुर्ग पोलिसांनी हल्लेखोर निखिल याला पुण्याला जात असताना तांदळवाडी परिसरातून ताब्यात घेतले.
Dharashiv News : बांधकाम व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला, टोळीकडून लोखंडी रॉडने मारहाण; धाराशिवमध्ये खळबळ, CCTV व्हिडिओ चर्चेतआरोपी निखिलवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याला चौकशीसाठी घेऊन गेले आहेत. दरम्यान हा हल्ला का झाला? हा हल्ला करण्यामागे नेमकं काय कारण होत हे अद्यापही समोर आलेलं नाही. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे.